ईव्हीएममुळे लोकशाही धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 01:15 AM2019-06-17T01:15:22+5:302019-06-17T01:16:10+5:30

ईव्हीएम निवडणूक प्रणालीमुळे देशातील शासन व्यवस्था व लोकशाही धोक्यात आली असून सर्व निवडणूका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्या, या मागणीचे निवेदन सर्वसामान्य नागरिकांनी भारताचे राष्ट्रपती यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पाठविले.

Democracy in danger due to EVM | ईव्हीएममुळे लोकशाही धोक्यात

ईव्हीएममुळे लोकशाही धोक्यात

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : बॅलेट पेपरवर निवडणुकीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : ईव्हीएम निवडणूक प्रणालीमुळे देशातील शासन व्यवस्था व लोकशाही धोक्यात आली असून सर्व निवडणूका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्या, या मागणीचे निवेदन सर्वसामान्य नागरिकांनी भारताचे राष्ट्रपती यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पाठविले.
निवेदनानुसार, सध्याचे निवडणूक निकाल बघता ईव्हीएम मशिन विश्वासपात्र राहीले नाही. ईव्हीएम मशिनमध्ये सहजरित्या छेडछाड केली जाऊ शकते. त्यामुळे लोकांचा विश्वास या मशिनवर राहीलेला नाही. ज्या देशांनी यापूर्वी ईव्हीएम मशिन वापरल्या होत्या, त्या सर्व देशांनी त्या मशिन बंद करून पुन्हा बॅलेट पेपरवर निवडणूका सुरू केल्या. परंतु, भारतातील निवडणूक आयोग ईव्हीएम मशिनच्या वापरावर ठाम आहे. त्यामुळे देशातील लोकशाही अबाधित राहण्यासाठी निवडणूकीतून ईव्हीएम मशिन हटवून बॅलेट पेपर निवडणूक प्रणाली लागू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
शिष्टमंडळात मंगेश वंजारी, शिशुपाल भूरे, संदीप मारबते, भाऊ कातोरे, सचिन मेश्राम, अजय तांबे, अंकूश वंजारी, संजय मते, सुकराम देशकर, उमेश मोहतूरे, सचिन बागडे, मुकूंद साखरकर, पुरुषोत्तम नंदूरकर, गणेश ठवकर आदी उपस्थित होते.

Web Title: Democracy in danger due to EVM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.