साकोलीत कृषी विद्यापीठाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 11:39 PM2017-11-17T23:39:58+5:302017-11-17T23:40:19+5:30

अकोला येथील डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठाचे विभाजन करुन कृषी विद्यापीठ साकोली येथे स्थापन करण्याची मागणी आमदार डॉ. परिणय फुके यांनी मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

The demand for Sakoli Agricultural University | साकोलीत कृषी विद्यापीठाची मागणी

साकोलीत कृषी विद्यापीठाची मागणी

Next
ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांना परिणय फुके यांचे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : अकोला येथील डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठाचे विभाजन करुन कृषी विद्यापीठ साकोली येथे स्थापन करण्याची मागणी आमदार डॉ. परिणय फुके यांनी मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
भंडारा मतदार संघातील साकोली हे स्थान पूर्व विदर्भातील मध्यवर्ती स्थान असून गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर नागपूर जिल्ह्यानाही फार जवळचे आहे. साकोली येथे डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी विद्यापीठ केंद्र सुध्दा उपलब्ध आहे. तसेच कृषी विभागाचे प्रशिक्षण अभ्यास केंद्र व जवळच मत्स्य बिज केंद्र तसेच गोंदिया- भंडारा येथे मासे तलाव असल्याने मतदार संघातील ज्येष्ठ व तज्ञ नागरिकांनी केलेल्या वारंवार मागणीमुळे परिस्थितीचा अभ्यास केला असता पूर्व विभागातील पाचही जिल्ह्याना सोईचे होईल असे साकोली या तालुक्याच्या ठिकाणी नवे कृषी विद्यापिठ स्थापन करुन देण्याची मागणी आमदार डॉ. परिणय फुके यांनी यांनी केली आहे.

Web Title: The demand for Sakoli Agricultural University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.