अपघात टाळण्यासाठी विजेपासून सावधानता बाळगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 10:02 PM2019-06-10T22:02:28+5:302019-06-10T22:02:48+5:30

पावसाळ्यात विजेमुळे दुर्घटना होण्याच्या घटना अधिक घडतात. त्यामुळे नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

Be wary of lightning to avoid accidents | अपघात टाळण्यासाठी विजेपासून सावधानता बाळगा

अपघात टाळण्यासाठी विजेपासून सावधानता बाळगा

Next
ठळक मुद्देमहावितरणचे आवाहन : पावसाळ्यात विशेष खबरदारी घेणे गरजेचे

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : पावसाळ्यात विजेमुळे दुर्घटना होण्याच्या घटना अधिक घडतात. त्यामुळे नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.
अतिवृष्टी, वादळामुळे तुटलेल्या वीज तारा, वीज खांब, रस्त्याच्या बाजुचे फिडर पिल्लर, रोहित्राचे लोखंडी कुंपन, फ्युज बॉक्स तसेच घरात असलेली ओलसरे विद्युत उपकरणे, शेती पंपाचा स्वीच बोर्ड आदीकडे दुर्लक्ष केल्याने दुर्घटना होण्याची शक्यता अधिक असते. या दुर्घटना टाळता येणे सहज शक्य आहे. मुसळधार पाऊस किंवा वादळी वारा यामुळे झाडाच्या फांद्या तुटून वीज तारांवर पडतात. तसेच झाडे पडल्याने वीज खांब वाकला जातो. परिणामी वीज तारा तुटण्याचे प्रकार घडतात. त्यात वीज प्रवाह असण्याची शक्यता असल्याने अशा तुटलेल्या, लोंबकळणाऱ्या वीज तारांपासून सावध राहावे, या तारांना हात लावण्याचा किंवा हटविण्याचा प्रयत्न करू नये.
शहरी व ग्रामीण भागात विजेची कोणतीही दुर्घटना घडल्यास टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. कोणत्याही कंपनीच्या मोबाईलवरून तसेच लॅन्डलाईन क्रमांकावरून वीज ग्राहकांना तक्रार दाखल करता येणार आहे.
अतिवृष्टी किंवा वादळामुळे वीज पुरवठ्यात तांत्रिक बिघाड होऊन दुर्घटना होण्याची शक्यता असते. अशा ठिकाणची माहिती या टोल फ्री क्रमांकावर देता येणार आहे. पूर किंवा अतिवृष्टीमुळे कोणत्याही क्षणी प्रतिकूल स्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून रोहित्र किंवा वीज पुरवठा बंद करण्यात येतो. नागरिकांच्या हितासाठीच वीज पुरवठा खंडीत होतो. ही बाब लक्षात घेऊन नागरिकांनी महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.
घरातील उपकरणे ओलाव्यापासून दूर ठेवा
पावसाळ्यात घरातील स्वीच बोर्ड किंवा विजेच्या उपकरणाचा ओलाव्याशी संपर्क येणार नाही, याची खबरदारी घ्यावी. घरातील वीज पुरवठ्याला आवश्यक अर्थिंग केल्याची खबरदारी घ्यावी. घरात शॉर्टसर्कीट झाल्यास मे स्वीचवरून वीज पुरवठा बंद करावा. घरातील दूरचित्रवाहिणीचे डीश किंवा एन्टीना वीज तारांपासून दूर ठेवावा. ओल्या कपड्यांवर विजेची इस्त्री फिरवू नये. विजेचे स्वीच बोर्ड किंवा कोणत्याही उपकरणाला पाणी लागणार नाही, याची दक्षता घ्यावी. विजेवर चालणारी सर्व उपकरणे स्वीच बोडार्पासून सर्व बंद करावी. विशेषत: टिनपत्राच्या घरात राहणाºया नागरिकांनी पावसाळ्यात अतिदक्ष राहून विजेपासून सुरक्षित राहण्यासाठी उपाययोजना कराव्यात. विजेच्या खांबांना जनावरे बांधू नयेत. दुचाकी टेकवून ठेवू नये. विद्युत खांबांना तार बांधून कपडे वाळू घालू नये, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.

Web Title: Be wary of lightning to avoid accidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.