उपविभागीय अधिकाऱ्यांना चिरडण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 10:27 PM2018-08-12T22:27:28+5:302018-08-12T22:27:47+5:30

रेतीची अवैध वाहतूक होत असलेल्या ट्रॅक्टरला थांबविण्याच्या प्रयत्नात भंडारा येथील उपविभागीय अधिकारी यांच्या अंगावर ट्रॅक्टर नेण्याचा प्रयत्न केला. वेळीच चपळाई दाखवून बाजूला झाल्याने एसडीओंचे प्राण वाचले. एसडीओ प्रविण महिरे यांच्या तक्रारीवरुन भंडारा पोलिसांनी पाच जणांविरुध्द एसडीओंच्या हत्येचा प्रयत्न व अन्य कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. या घटनेने प्रशासनात खळबळ माजली आहे.

Attempt to crush sub-divisional officers | उपविभागीय अधिकाऱ्यांना चिरडण्याचा प्रयत्न

उपविभागीय अधिकाऱ्यांना चिरडण्याचा प्रयत्न

Next
ठळक मुद्देप्रशासनात खळबळ : रेती तस्करांचे वाढले धाडस, खोकरला गावाजवळ चालविला ट्रॅक्टर, दोन जणांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : रेतीची अवैध वाहतूक होत असलेल्या ट्रॅक्टरला थांबविण्याच्या प्रयत्नात भंडारा येथील उपविभागीय अधिकारी यांच्या अंगावर ट्रॅक्टर नेण्याचा प्रयत्न केला. वेळीच चपळाई दाखवून बाजूला झाल्याने एसडीओंचे प्राण वाचले. एसडीओ प्रविण महिरे यांच्या तक्रारीवरुन भंडारा पोलिसांनी पाच जणांविरुध्द एसडीओंच्या हत्येचा प्रयत्न व अन्य कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. या घटनेने प्रशासनात खळबळ माजली आहे.
माहितीनुसार, भंडारा येथील एसडीओ प्रविण मेहरे हे शनिवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास शासकीय वाहनाने जात असताना खोकरला गावाजवळ विरुध्द दिशेने दोन ट्रॅक्टर येताना दिसले. दोन्ही ट्रॅक्टरमध्ये रेती भरलेली होती. प्रविण महिरे हे वाहनाखाली उतरुन रस्त्याच्या मधोमध उभे होऊन दोन्ही ट्रॅक्टर चालकांना दुरुनच हात दाखवून थांबण्याची खूण केली. शासकीय वाहन व अधिकारी असल्याचे लक्षात येताच दोन्ही ट्रॅक्टर चालकांनी प्रविण महिरे यांच्या अंगावर ट्रॅक्टर नेण्याचा प्रयत्न केला.
वेळीच महिरे हे रस्त्याच्याकडेला झाल्याने त्यांचा जीव वाचला. दोन्ही ट्रॅक्टर चालक सुसाट वेगाने वाहन चालवून पळून गेले. यावेळी ट्रॅक्टर ट्रॉलीमधील रेती रस्त्यावर फेकली जाईल या पध्दतीने वाहन पळवित गेले.
एसडीओ प्रविण महिरे यांच्या तक्रारीवरुन दोन्ही ट्रॅक्टर चालकांसह अन्य तिघांविरुध्द भंडारा पोलिसांनी जिवे मारण्याचा प्रयत्न करणे, शासकीय कामात अडथळा निर्माण करणे यासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. विनोद प्रभु कांबळे रा. कारधा व निलेश सुदाम उके रा. कोथुर्णा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. तीन जण फरार आहेत. त्यात विरेश लिचडे रा. कोथुर्णा व अन्य दोन्ही ट्रॅक्टर चालकाचा समावेश आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक अमर खाडे करीत आहेत.

भंडारा पोलिसांनी याप्रकरणी सबंधितांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत सहभागी उर्वरित आरोंपीचा शोध घेण्यात येत आहे. तपास सुरू आहे.
- अमर खाडे, तपासी अधिकारी
तथा पोलीस उपनिरीक्षक भंडारा

Web Title: Attempt to crush sub-divisional officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.