आंबेडकरी साहित्य संमेलनाचे बौद्ध संस्कृतीशी अजोड नात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 01:19 AM2018-04-25T01:19:17+5:302018-04-25T01:19:17+5:30

आंबेडकरी साहित्य हे केवळ एकच वर्गाचे नसून ते भारतीयांचे आहे. आंबेडकरी साहित्य संमेलनाचे बौद्ध संस्कृतीशी अजोड नाते आहे, असे प्रतिपादन संमेलनाध्यक्ष भगवान सुखदेवे यांनी केले.

Ambedkar Sahitya Sammelan's unconventional Buddhist culture | आंबेडकरी साहित्य संमेलनाचे बौद्ध संस्कृतीशी अजोड नात

आंबेडकरी साहित्य संमेलनाचे बौद्ध संस्कृतीशी अजोड नात

Next
ठळक मुद्देभगवान सुखदेवे : लाखनीत रंगले कवी संमेलन, ब्रोकन मेन मल्टीपर्पजचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनी : आंबेडकरी साहित्य हे केवळ एकच वर्गाचे नसून ते भारतीयांचे आहे. आंबेडकरी साहित्य संमेलनाचे बौद्ध संस्कृतीशी अजोड नाते आहे, असे प्रतिपादन संमेलनाध्यक्ष भगवान सुखदेवे यांनी केले.
ब्रोकन मेन मल्टीपर्पज सोसायटी लाखनीद्वारा आंबेडकरी साहित्य संमेलन, कवी संमेलन, निबंध स्पर्धेचे बक्षिस वितरण समारोह महाप्रज्ञा बुद्ध विहार येथे आयोजित करण्यात आले. त्याप्रसंगी संमेलनाध्यक्ष म्हणून ते बोलत होते.
यावेळी सी.एम. बागडे, कवी वामन शेळमाके प्रा. प्रमोदकुमार अणेराव, प्रा. डॉ. के.एल. देशपांडे, प्रा. डॉ. उमेश बंसोड, प्रा. प्रल्हाद सोनेवाने, प्रा. डॉ. सुरेश खोब्रागडे, नामदेव कानेकर आदी उपस्थित होते.
ते म्हणाले, विज्ञानवादी बुद्धिस्ट संस्कृती आपोआप आमुलाग्र बदलांचे, वैचारिक सम्यक ज्ञान आहे. समाजशील मन परिवर्तनाचे साहित्य विशेष अंगाने परिचित असताना एक संवेदनशील शतकांची पार्श्वभूमी तिचे स्वरूप लेखनकार्य, घटनात्मक, आंदोलनात्मक वृत्तीचे असून दर्जा व अधिकार आंदोलनातून करीत होतो. साहित्याची निर्मिती क्रांतीच्या प्रक्रियेला गतीमान करणारी शक्ती आहे. कवितेत क्रांती होत नसली तरी ती विचाराचंी ठिणगी टाकीत आचाराला प्रवृत्त करते. आंबेडकरी कवी आपल्या कवितेला आपल्या लढण्याचे शस्त्र समजतो.
दाभोलकर, पानसरे, कलबुर्गीनंतर मी, मरणाला भीणार नाही, असा बलस्थानी संदेश मुन्ना नंदागवळी यांनी दिला. संतापाला जर कर्तृत्व, विशाल सामाजिक जाणीव, संयम आणि कल्पकता यांची जोड तर, ही क्रांती घडवून आणू शकते. क्रांतीपुत्रांनो, पसाभर उजेडासाठी मोनाद कसे सी.एम. बागडे यांनी तर, कवी वामन शेळमाके भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते तर तुझ्या चळवळीचे तुकडे झालेच नसते. ही कष्टाची आत्मनिष्ठा, सामाजिक बांधिलकी कोणीही नाकारू शकत नाही. बहुजनांची उद्वेगजनक परिस्थितीमुळे कवी स्वाभाविक अस्वस्थ आहे. अन्यायाचा प्रतिकार कसा करायचा, हा प्रश्न त्याच्यासमोर आवासून उभा आहे. 'भीम के दिवानो तुम्हे भीमजी के राहो पर चलना होगा, चाहे काटे क्यू ना हो, तुफानों से लढना होगा' कवी आकाश भैसारे यांनी खंत मनाला निर्णायक पवित्रा घेते. मित्रा, तू याच भूमीतला, मीही याच भूमीतला मग तुझ्यात माझ्यात का हे अंतर, कुठवर चालायच निरंतर कविता सादर केली. यावेळी मनोज बारसागडे, शिवानी काटकर, डॉ. हटणागर, अ‍ॅड. प्रशांत गणवीर, निकेत हुमणे यांच्यासह जिल्ह्यातील शेकडो श्रोतगण प्रामुख्याने उपस्थित होते.
कवी संमेलनाचे संचालन प्रा. डॉ. रेवाराम खोब्रागडे यांनी तर, आभार प्रदर्शन सी.एम. बागडे यांनी केले.

Web Title: Ambedkar Sahitya Sammelan's unconventional Buddhist culture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.