यूपीएससीत स्नेहा गित्तेला ३३१ वा रॅँक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2019 12:21 AM2019-04-07T00:21:18+5:302019-04-07T00:22:35+5:30

केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या नागरी सेवा परीक्षांचा अंतिम निकाल शुक्र वारी जाहिर झाला. यात बीडच्या डॉ. स्नेहा सूर्यकांत गिते ही पहिल्या प्रयत्नात देशात ३३१ वी रँक मिळवित उत्तीर्ण झाली आहे.

UPSC Sneha Gittela 331nd Rank | यूपीएससीत स्नेहा गित्तेला ३३१ वा रॅँक

यूपीएससीत स्नेहा गित्तेला ३३१ वा रॅँक

googlenewsNext

बीड : केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या नागरी सेवा परीक्षांचा अंतिम निकाल शुक्र वारी जाहिर झाला. यात बीडच्या डॉ. स्नेहा सूर्यकांत गिते ही पहिल्या प्रयत्नात देशात ३३१ वी रँक मिळवित उत्तीर्ण झाली आहे.
शहरातील डॉ.सूर्यकांत गिते यांची डॉ. स्नेहा ही मुलगी आहे. तिचे दहावीपर्यंत सेंट अ‍ॅन्स स्कूलमध्ये, बारावीपर्यंत लातूर येथे आणि वैद्यकीय शिक्षण मुंबई येथे झाले आहे. यूपीएससी परीक्षेत मिळालेल्या ३३१ व्या रँकमुळे उच्च पदस्थ अधिकारी होण्याची संधी मिळेल असा विश्वास डॉ. स्नेहाने व्यक्त केला.
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना सातत्य, एकाग्रता, संयम, वाचन गरजेचे आहे. माझ्या यशात आई-वडील, भाऊ सुमित, सुशिल तसेच वेळोवेळी मार्गदर्शन करणाऱ्यांचा वाटा असल्याचे डॉ.स्नेहा गिते म्हणाल्या. डॉ.अविनाश धर्माधिकारी व महेश भागवत यांचेही तिला मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल डॉ.स्नेहा हिचे यांचे स्वागत होत आहे.

Web Title: UPSC Sneha Gittela 331nd Rank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.