परळीत दोन गटांत धुमश्चक्री; ११ अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 01:02 AM2018-03-23T01:02:12+5:302018-03-23T01:02:12+5:30

Two groups in the row; 11 arrest | परळीत दोन गटांत धुमश्चक्री; ११ अटकेत

परळीत दोन गटांत धुमश्चक्री; ११ अटकेत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परळी : शहरातील गणपती मंदिराजवळ बुधवारी रात्री दहाच्या सुमारास जुन्या भांडणाच्या कारणावरुन भोईगल्लीत राहणाऱ्या दोन गटात हाणामारी झाली. यावेळी दगडफेकही करण्यात आली. रात्री घटनास्थळी शहर पोलिसांनी तातडीने भेट देत शांतता प्रस्थापित केली. दोन्ही गटातील एकूण ११ जणांना गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास भोईगल्लीतून शहर पोलिसांनी अटक केली आहे.

येथील भोईगल्लीत राहणाºया युवकांच्या दोन गटात बुधवारी रात्री दहाच्या सुमारास तुंबळ हाणामारी झाली. याठिकाणी शाम बावणे, आकाश बावणे हे दोघेजण थांबलेले होते. आकाशासोबत दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादाच्या कारणावरुन वाहेद रशीद खान पठाण, नादर खान समंदर खान पठाण, मारुफ शेख माजिद सर्व राहणार भोईगल्ली यांच्यासह इतर सात ते आठ जणांनी शिवीगाळ करुन दगडफेक व मारहाण केली. यामध्ये दोघेजण जखमी झाले आहेत. आरोपींनी बघून घेऊ अशी धमकी दिली. जखमी शाम शंकर बावणे व आकाश बावणे यांच्यावर परळी उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले.
वाहेद रशीद खान यांना बुधवारी रात्री दहाच्या सुमारास जुन्या भांडणाच्या कारणावरुन आकाश बावणे यांनी मारहाण केली. तसेच शाहरुखला ही नाकावर मारले. तसेच मिराज शेख यांनाही धकाबुक्की केली. त्यानंतर तेथून मारहाण करणारे लोक निघून गेले.

एका गटातील मारहाण प्रकरणी वाहेद रशीद खान यांनी परळी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यावरुन आकाश गंगाधर बावणे, शाम शंकर बावणे, कृष्णा बावणे व इतर आठ ते दहा जणांविरुध्द खुनी हल्ल्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील तीन्ही आरोपी परळी शहर पोलिसांनी जेरबंद केले.
दुसºया गटातील शाम शंकर बावणे यांनी परळी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन वाहेद खान रशीद खान पठाण, मिराज शहाबुद्दीन शेख, शेख शाहरुख शेख माजिद, बाबा खान फिरोज खॉन, शेख मारुफ शेख माजिद, फैजल खान, नसीम खान, शेख शकील उर्फ जुबेर शेख शबीर, नादर खान समंदर खान, पठाण रा.भोईगल्ली यांच्या विरुद्ध खुनी हल्ल्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

प्रकरणातील आठही आरोपींना परळी शहर पोलिसांनी अटक केली आहे. परळी शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत मानकर, सहाय्यक निरीक्षक दत्तात्रय काळे, उपनिरीक्षक विकास आडे, एन. डी. हारगावकर, शंकर गुडे व इतर पोलिस कर्मचाºयांनी आरोपींना अटक केली आहे.

Web Title: Two groups in the row; 11 arrest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.