‘त्या’ पाच पोलिसांची चौकशी झाली सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 11:20 PM2018-03-12T23:20:44+5:302018-03-12T23:20:50+5:30

मागील आठवड्यात मोबाईल चोरून त्यांचे आयएमईआय क्रमांक बदलून विक्री करणाºया टोळीचा पर्दाफाश स्थानिक गुन्हे शाखेने केला होता. परंतु या टोळीसोबत गुन्हे शाखा आणि दरोडा प्रतिबंधकच्या पाच कर्मचाºयांचा ‘अर्थ’पूर्ण सहभाग असल्याचे समोर आले होते. या पाच पोलिसांच्या चौकशीचे आदेश पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी दिले असून उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांनी चौकशी सुरू केली आहे.

'These' five policemen were investigated | ‘त्या’ पाच पोलिसांची चौकशी झाली सुरू

‘त्या’ पाच पोलिसांची चौकशी झाली सुरू

googlenewsNext
ठळक मुद्देमोबाईल चोरी प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : मागील आठवड्यात मोबाईल चोरून त्यांचे आयएमईआय क्रमांक बदलून विक्री करणाºया टोळीचा पर्दाफाश स्थानिक गुन्हे शाखेने केला होता. परंतु या टोळीसोबत गुन्हे शाखा आणि दरोडा प्रतिबंधकच्या पाच कर्मचाºयांचा ‘अर्थ’पूर्ण सहभाग असल्याचे समोर आले होते. या पाच पोलिसांच्या चौकशीचे आदेश पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी दिले असून उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांनी चौकशी सुरू केली आहे.

गहिनीनाथ मनोहर पाळवदे (बीड), सतीश सुखदेव गायकवाड (रा.हिरवरसिंगा ता.शिरूर), सुभाष अर्जुन गायकवाड (रा. शिरापूर धुमाळ ता. शिरूर), अंकुश विश्वनाथ काळे (रा.विठ्ठलनगर, वृंदावन गार्डनसमोर, एमआयडीसी रोड बीड) या चौघांनी बीडसह नाशिक, अहमनगर जिल्ह्यातून विविध कंपन्यांचे महागडे मोबाईल चोरले होते. त्यानंतर पाळवदे मार्फत त्याचे आयएमईआय क्रमांक बदलून ते विक्री केले होते.

ही माहिती काही महिन्यांपूर्वीच एलसीबी व एडीएसच्या काही कर्मचाºयांना होती. परंतु त्यांनी याकडे ‘अर्थ’पूर्ण दुर्लक्ष केले. त्यामुळेच त्यांचा विश्वास बळावला आणि त्यांनी अनेकांचे मोबाईल चोरले होते. ही माहिती पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांच्या कानावर जाताच त्यांनी तात्काळ या कर्मचाºयांची चौकशी करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर हे त्यांची चौकशी करीत आहेत.
चौकशी सुरू असून लवकरच ती पूर्ण करून वरिष्ठांकडे अहवाल सादर केला जाईल, असे खिरडकर यांनी सांगितले.

अखेर सांगितली हकीकत
टोळीतील काही आरोपींनी सर्व प्रकार तपासी अधिकाºयांना सांगितल्याचे समजते. त्यांनी या प्रकरणाशी संबंधित असलेल्या कर्मचा-यांची नावेही सांगितली असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
परंतु या प्रकरणात एलसीबीच्या कर्मचा-यांचा सहभाग नसून केवळ एडीएसच्या कर्मचाºयांचा सहभाग असल्याचे बोलले जात आहे. यात कोण दोषी आणि कोण निर्दाेश, हे मात्र चौकशीनंतरच समोर येईल.

Web Title: 'These' five policemen were investigated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.