कैद्याचा दुसऱ्यांदा आत्महत्येचा प्रयत्न !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 12:21 AM2019-04-01T00:21:13+5:302019-04-01T00:22:56+5:30

अत्याचाराच्या गुन्ह्यात जिल्हा कारागृहात बंदिवान असलेल्या कैद्याने दुसऱ्यांदा आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. शनिवारी सायंकाळच्या सुमारास शौचालयात जाऊन हातावर काचेने जखमा करून या कैद्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

Suicide attempt for the second time in prison! | कैद्याचा दुसऱ्यांदा आत्महत्येचा प्रयत्न !

कैद्याचा दुसऱ्यांदा आत्महत्येचा प्रयत्न !

googlenewsNext
ठळक मुद्देबीड जिल्हा कारागृहात घटना : बलात्काराच्या गुन्ह्यातील बंदिवान

बीड : अत्याचाराच्या गुन्ह्यात जिल्हा कारागृहात बंदिवान असलेल्या कैद्याने दुसऱ्यांदा आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. शनिवारी सायंकाळच्या सुमारास शौचालयात जाऊन हातावर काचेने जखमा करून या कैद्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
पप्पू विश्वनाथ झिंजुर्डे (वय २३ वर्षे रा. नाळवंडी) असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या कैद्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संरक्षण भिंतीवर लावलेल्या काचा खाली पडल्या होत्या. त्याच काचा उचलून कैदी झिंजुर्डे हा शौचालयात गेला. शनिवारी सायंकाळच्या सुमारास त्याने हातावर काचाने जखमा करून आत्महत्येचा प्रयत्न केला.
विशेष म्हणजे जखमा केल्यानंतर तो स्वत: बाहेर आला आणि आपण आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले. त्यानंतर कारागृह प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. त्याला तात्काळ बंदोबस्तात जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले.
रात्रभर उपचार केल्यानंतर त्याला पुन्हा कारागृहात बंदिस्त करण्यात आले. त्याने असा प्रकार नेमका कोणत्या कारणामुळे केला, हे मात्र समजू शकले नाही.
याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कारागृह अधीक्षक एम.एस.पवार, कारागृह निरीक्षक संजय कांबळे यांनी तात्काळ याबाबत उपाययोजना केल्या आहेत.
संरक्षण भिंतीवरील काचा खाली पडणार नाहीत, आणि पडल्या तर ते तात्काळ उचलल्या जातील, यासाठी सूचना केल्या आहेत.
पंधरवड्यातील तिसरी घटना : दुसरा अयशस्वी प्रयत्न
दरम्यान, मागील पंधरा दिवसांत तीन कैद्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.
या यातील एक कैदी हा अट्टल गुन्हेगार असल्याचे सांगण्यात आले.
सर्वांनीच हातावर काचेने वार करून घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. या घटनांमुळे कारागृह प्रशासनात खळबळ उडाली आहे.
पप्पू याच्याविरुद्ध अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने तो कारागृहात बंदिस्त आहे. कारागृहात आल्यापासून तो मानसिकदृष्ट्या खचला असल्याचे समजते. त्यामुळेच त्याने यापूर्वी २८ फेब्रुवारीला आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

Web Title: Suicide attempt for the second time in prison!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.