तरुणाईची भूमिका निर्णायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 12:21 AM2019-03-27T00:21:25+5:302019-03-27T00:22:51+5:30

बीड लोकसभा मतदार संघात होऊ घातलेल्या निवडणुकीत वयाची पन्नाशी ओलांडलेल्या मतदारांच्या तुलनेत नवमतदारांसह १८ ते ४० वयोगटातील मतदारांची संख्या जवळपास दुप्पट आहे.

Role of youth is crucial | तरुणाईची भूमिका निर्णायक

तरुणाईची भूमिका निर्णायक

googlenewsNext
ठळक मुद्देबीड लोकसभा मतदार संघ : २० लाख २८ हजार ३३९ मतदार बजावणार हक्क

अनिल भंडारी।
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : बीड लोकसभा मतदार संघात होऊ घातलेल्या निवडणुकीत वयाची पन्नाशी ओलांडलेल्या मतदारांच्या तुलनेत नवमतदारांसह १८ ते ४० वयोगटातील मतदारांची संख्या जवळपास दुप्पट आहे. सर्वच राजकीय पक्षांनी आपले लक्ष तरुणांवर केंद्रित केले असले तरी ५० ते ८० वयोगटातील मतदारांची भूमिकाही महत्वाची ठरणार आहे.
३१ जानेवारीपर्यंत निवडणूक विभागाकडे नोंदणी केलेल्या आकड्यांनुसार बीड जिल्ह्यात एकूण २० लाख २८ हजार ३३९ मतदार आहेत. यात १० लाख ७३ हजार ५२५ पुरुष तर ९ लाख ५४ हजार ८०७ महिला मतदार आहेत. २०१४ च्या तुलनेत यंदा १ लाख ९६ हजार १८३ मतदार वाढले आहेत. (मतदार नोंदणी कार्यक्रमानुसार यात आणखी काही प्रमाणात भर पडणार आहे.)
१८ ते ४९ वयोगटात एकूण १३ लाख ६९ हजार २७ मतदार आहेत. यात ७ लाख ४९ हजार ४४६ पुरुष आणि ६ लाख १९ हजार ५८१ महिला मतदार आहेत. या गटात पुरुष मतदारांची संख्या महिला मतदारांच्या तुलनेत जास्त प्रमाणात आहे. ५० ते ८० वयोगटातील मतदारांची संख्या ६ लाख ५९ हजार ३०५ इतकी आहे. यात पुरुष मतदारांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या जवळपास ११ हजाराने जास्त आहे. ८० पेक्षा जास्त वयोगटातील मतदारांची संख्या ७० हजार ३४० इतकी असून पुरुष मतदार ३० हजार ४७१ तर महिला मतदारांची संख्या ३९ हजार ८६९ इतकी आहे.
बीड जिल्ह्यात एकूण सात तृतीयपंथी मतदारांची नोंद आहे. २० ते २९ वयोगटात ४ तर ६० ते ६९ वयोगटात २ आणि ३० ते ३९ वयोगटात एका मतदाराचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.
तरुण वर्ग जास्त सक्रिय
निवडणुकांमध्ये तरुण वर्ग तुलनेने जास्त सक्रिय असतो. १८ ते ३९ वयोगटातील ९ लाख ४७ हजार ७९५ मतदार या निवडणुकीत आपला कस दाखवणार आहेत. तर ५० ते ८० वयोगटातील मतदारही तितकाच महत्वाचा म्हणजे निर्णायक ठरणार आहे.
दिव्यांग मतदार
जिल्ह्यात ४ हजार १०० दिव्यांग मतदार आहेत. ५६८ मतदार दृष्टीदोष असलेले आहेत, तर ५९१ मतदार हे मूकबधीर आहेत. शारीरिकदृष्ट्या दिव्यांग असलेले २२१८ मतदार असून, अन्य प्रकारचे अपंगत्व असलेले ६६० मतदार आहेत.

Web Title: Role of youth is crucial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.