परळीत राकाँला आघाडी, ग्रामीणमध्ये भाजपच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 12:20 AM2019-05-26T00:20:00+5:302019-05-26T00:20:52+5:30

लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांना परळी विधानसभा मतदारसंघात १८ हजाराचे मताधिक्य मिळाले असले तरी शहरात मात्र १८०० मतांची आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना मिळाली आहे.

Rakla lead in Parli, BJP in rural areas | परळीत राकाँला आघाडी, ग्रामीणमध्ये भाजपच

परळीत राकाँला आघाडी, ग्रामीणमध्ये भाजपच

googlenewsNext
ठळक मुद्दे३४ वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला; आगामी विधानसभा निवडणूक बहीण - भावासाठी आव्हानात्मक

संजय खाकरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
परळी : लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांना परळी विधानसभा मतदारसंघात १८ हजाराचे मताधिक्य मिळाले असले तरी शहरात मात्र १८०० मतांची आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना मिळाली आहे. त्यामुळे परळी शहर हे राष्ट्रवादी काँग्रेस सोबतच असल्याचे दिसून आले. ३४ वर्षाांपासून भाजपचा बालेकिल्ला असलेला ग्रामीण भाग हा या निवडणुकीतही अभेद्य राहिला.
भाजपचा बालेकिल्ला असलेल्या परळी विधानसभा मतदारसंघात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी गेल्या पाच वर्षात चांगलीच बाजू भक्कम केली आहे. बीड लोकसभा २०१४ च्या सार्वत्रिक व पोटनिवडणुकीत मिळालेल्या मताधिक्यपेक्षाही महायुतीला या निवडणुकीत कमी मताधिक्य आहे. मात्र, राष्ट्रवादीच्या उमेदवारापेक्षा जास्त मतदान असले तरी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत हे मताधिक्य कायम राहील हे आजच सांगता येणार नाही. तथापि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भाजपचा बालेकिल्ला भेदण्याचे आव्हान स्वीकारले आहे. त्यांचा परळी विधानसभा मतदारसंघात मतदारांशी अधिक संपर्क आहे. सर्वसामान्यांच्या बाजूने ते उभे राहतात, कार्यकर्त्यांची तगडी टीम आहे. परळी नगर परिषद, पंचायत समिती, बाजार समिती ताब्यात आहेत. स्वत: धनंजय मुंडे यांना मानणारा एक वेगळा वर्ग आहे. त्यामुळे येणाºया निवडणुकीत धनंजय मुंडे यांचा सामना भाजपला करावा लागणार आहे.
दुसरीकडे ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी जिल्ह्यात बेरजेचे राजकारण सुरू करत लोकसभा निवडणुकीत यश मिळविले. त्यामुळे परळी विधानसभा मतदारसंघातही आगामी निवडणुकीत बाजी मारण्याचा त्यांना मोठा विश्वास आहे. शहर व ग्रामीण भागात विकासाची कामे आणणे सुरू केले आहे. विधानसभेला या मतदार संघात ताई व भाऊ यांच्यापैकी कामाचा कोण हेच पाहिले जाणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बहिण भावामध्ये लढत होणार आहे. दोघांनाही येणाºया निवडणुकीत आव्हाने राहणार आहेत. कारण वंचित आघाडी ही प्रत्येक गावात पोहचली आहे.
मोठ्या प्रकल्पाची प्रतीक्षा
राज्य व केंद्रात भाजपाची सत्ता असूनही परळी मतदारसंघात गत ५ वर्षात नवीन एकही प्रकल्प उभारला गेला नाही.
त्यामुळे औद्योगिकदृष्ट्या सत्तेचा उपयोग झाला नाही, कामगारांच्या हाताला काम मिळत नाही, पिण्याच्या पाण्याची योजना पूर्ण होत नाही, हे महत्त्वाचे प्रश्न कायमच आहेत.
शहर व ग्रामीण भागात रस्त्याचे काम जोरात सुरू आहे, अपवाद राहिला परळी-पिंपळा धायगुडा रस्ता.
या रस्त्याचे काम हे सुनील हायटेक एजन्सीमुळे अर्धवट राहिले आहे. त्यामुळे जनतेतून मतांमध्ये काही अंशी रोष प्रकटला. रस्ता लवकर होईल या आशेने काहींनी भाजपला पसंती दर्शवली.

Web Title: Rakla lead in Parli, BJP in rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.