गतवर्षीचे तूर, हरभऱ्याचे साडेचार कोटीचे चुकारे मिळणार कधी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 12:16 AM2018-12-10T00:16:56+5:302018-12-10T00:17:18+5:30

अद्याप ४ कोटी २८ लाख ४८ हजार रुपयांचे वाटप बाकी असून डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत संबंधित शेतक-यांच्या खात्यात रक्कम जमा होऊ शकलेली नाही.

Last year's t Rs. 4.5 crores pending | गतवर्षीचे तूर, हरभऱ्याचे साडेचार कोटीचे चुकारे मिळणार कधी ?

गतवर्षीचे तूर, हरभऱ्याचे साडेचार कोटीचे चुकारे मिळणार कधी ?

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : मागील हंगामात नाफेडमार्फत खरेदी केलेल्या हरभरा आणि तुरीचे जवळपास २४० कोटी रुपये शेतक-यांना अदा करण्यात आले असून अद्याप ४ कोटी २८ लाख ४८ हजार रुपयांचे वाटप बाकी असून डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत संबंधित शेतक-यांच्या खात्यात रक्कम जमा होऊ शकलेली नाही.
मागील २०१७-१८ हंगामात नाफेडमार्फत जिल्ह्यातील १५ खरेदी केंद्रावर २ लाख २१ हजार ७२४. ८७ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली होती. हमीदर ५ हजार ४५० रुपये प्रतीक्विंटल होता. १ डिसेंबरअखेर शेतक-यांना ११९ कोटी ९१ लाख ९५ हजार १९८ रुपयांचे पेमेंट अदा करण्यात आले. तर ९२ लाख ५ हजार ३४३ रुपये शेतक-यांना अदा करणे बाकी आहे.
तसेच २ लाख ९६ हजार ८८६. ८६ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला होता. हमीभाव ४४०० रुपये प्रती क्विंटल होता. हरभरा विक्रीस घातलेल्या शेतक-यांना १२७ कोटी २६ लाख ५९ हजार ४३ रुपयांचे पेमेंट अदा करण्यात आलेले आहे. तर ३ कोटी ३६ लाख ४३ हजार १४१ रुपये अदा करणे बाकी आहे.
जिल्ह्यातील बीड, गेवराई, माजलगाव, पाटोदा, कडा, केज, धारुर, शिरुर, परळी, वडवणी, अंबाजोगाई, आष्टी, पारनेर, बर्दापूर, माजलगाव एपीएमसी अशा १५ केंद्रांवर तूर आणि हरभ-याची खरेदी केली होती. खरेदी प्रक्रिया पूर्ण होऊन पेमेंट वाटपाची कार्यवाही सुरु झाली. सात महिन्यानंतरही सुमारे ४ कोटी २८ लाख ४८ हजार ४८४ रुपये शेतक-यांना वाटप होणे बाकी आहे. पेमेंट वाटप गतीने करण्याची मागणी शेतक-यांतून होत आहे. यंदाच्या वर्षी उत्पादनात झालेली घट लक्षात घेता बाजारात तेजी येऊ शकते. त्यामुळे केंद्रांवर माल आणताना शेतकरी बाजाराचाही विचार करीत आहेत.
यंदाची खरेदी संथ गतीने सुरु
बीड जिल्ह्यात यावर्षी नाफेडमार्फत १९ खरेदी केंद्रांवर ३७ दिवसात मूग आणि उडदाची एकूण ९ हजार ९७६ क्विंटल खरेदी झाली आहे. मूगासाठी नोंदणी केलेल्या श्ेतक-यांचे प्रमाण पाहता दहा टक्के शेतकºयांच्या मूगाची खरेदी झाली आहे. जिल्ह्यात उडीद, मूग आणि सोयाबीन खरेदीसाठी केंद्र निश्चित केल्यानंतर नोंदणी सुरु झाली. आक्टोबरच्या तिस-या आठवड्यात खरेदी सुरु झाली.
जिल्ह्यातील १० हजार ९६८ शेतकºयांनी मूग विक्रीसाठी आॅनलाईन नोंदणी केली. २ हजार १२७ शेतक-यांचा ९ हजार ८१३. ५० क्विंटल मूग १९ केंद्रांवर खरेदी करण्यात आला. तर उडदासाठी ९५९ शेतक-यांनी आॅनलाईन नोंदणी केली होती. त्यापैकी ५१ शेतक-यांचा १६३ क्ंिवटल उडीद खरेदी करण्यात आला. सोयाबीनसाठी ६५८ शेतक-यांनी आॅनलाईन नोंदणी केली. या सर्व शेतक-यांना एसएमएस पाठविण्यात आले. परंतू ३ डिसेंबरपर्यंत एकाही शेतक-याने सोयाबीन विक्रीसाठी आणलेले नव्हते.

Web Title: Last year's t Rs. 4.5 crores pending

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.