पाण्याच्या मागणीसाठी माजलगाव पंचायत समितीवर शेतकरी संघर्ष समितीचा घागर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 01:58 PM2019-05-29T13:58:48+5:302019-05-29T14:04:33+5:30

धरणातून थेट पाणी मिळावे अशी मागणी

Ghagar Morcha of Farmers on Majalgaon Panchayat Samiti on water demand | पाण्याच्या मागणीसाठी माजलगाव पंचायत समितीवर शेतकरी संघर्ष समितीचा घागर मोर्चा

पाण्याच्या मागणीसाठी माजलगाव पंचायत समितीवर शेतकरी संघर्ष समितीचा घागर मोर्चा

Next
ठळक मुद्देआनंदगाव येथे पाण्याची भीषण परिस्थिती आनंदगावसाठी धरणातून थेट जलवाहिनी टाकण्याची मागणी

माजलगाव (बीड ) : तालुक्यातील आनंदगाव येथे दुष्काळामुळे भीषण परिस्थिती आहे. यावर त्वरित उपाययोजना करण्यात याव्यात या मागणीसाठी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने माजलगाव पंचायत समिती कार्यालयावर बुधवारी (दि.२९) घागर मोर्चा काढण्यात आला.

तालुक्यात पिण्याच्या पाण्याची परिस्थिती गंभीर आहे. तसेच जनावरांनासुद्धा पाणी मिळत नाही. यावर  तालुका प्रशासनाकडून कुठलीही ठोस उपाययोजना करण्यात आली नाही. यामुळे दिवसेंदिवस पाणी समस्या बिकट होत चाली आहे. तालुक्यातील आनंदगाव येथे भयंकर पाणी समस्या निर्माण झाली. यावर उपाययोजना करत आनंदगावसाठी धरणातून थेट जलवाहिनी टाकण्यात यावी, या मागणीसाठी पंचायत समिती कार्यालयावर शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने घागर मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे नेतृत्व गंगाभिषण थावरे यांनी केले. यावेळी मोठ्याप्रमाणावर ग्रामस्थ सहभागी होते. गटविकास अधिकारी वि.टी. चव्हाण यांना आंदोलकांनी मागण्यांचे निवेदन दिले.

Web Title: Ghagar Morcha of Farmers on Majalgaon Panchayat Samiti on water demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.