विविध मागण्यांसाठी एकाच मंडपात पाच उपोषणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2019 12:19 AM2019-01-26T00:19:20+5:302019-01-26T00:19:35+5:30

शुक्र वारी शासकीय कार्यालयासमोर झालेल्या विविध आंदोलनानी शहर दणाणले. तहसील कार्यालयासमोर एका मंडपात पाच विविध मागण्यांसाठी उपोषण सुरु झाले.

Five fasts in one tent for various demands | विविध मागण्यांसाठी एकाच मंडपात पाच उपोषणे

विविध मागण्यांसाठी एकाच मंडपात पाच उपोषणे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
धारुर : शहरात शुक्र वारी शासकीय कार्यालयासमोर झालेल्या विविध आंदोलनानी शहर दणाणले. तहसील कार्यालयासमोर एका मंडपात पाच विविध मागण्यांसाठी उपोषण सुरु झाले. कृषी कार्यालयासमोर महिला मजुरांनी ठिय्या आंदोलन केले, तर महावितरण कार्यालयासमोर गावंदरा येथील तरुणांनी उपोषण सुरु केले आहे. शुक्र वार हा शहरासाठी आंदोलन वार ठरला.
धारुर शहरात २५ जानेवारी हा आंदोलनकर्त्यांचा वार ठरला. तहसील कार्यालयासमोर तर एका मंडपात पाच विषयावर आंदोलने झाली. यामध्ये अतिक्र मण काढण्याच्या मागणीसाठी सादेक इमानदार यांनी, तर दिलीप बिल्डकॉन चे कामामुळे घराला तडे गेले मदत मिळावी म्हणून चोरांबा येथील अशोक चव्हाण हे उपोषणास बसले आहेत. राजमुद्रा सामाजिक संघटनेच्या वतीने ग्रामीण रु ग्नालयाची पाणीपुरवठा योजना तात्काळ करा या मागणीसाठी बबलू सावंत, सुनील गैबी हे अमरण उपोषणास बसले आहेत. रिपाइं युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष बंटी गायसमुद्रे हे बाजार समिती आवारातील कामाच्या चौकशी मागणीसाठी उपोषणास बसले आहेत. वाघोली येथील एक शेतकरी आॅनलाईन शेती गायब झाली ती शोधून देण्याच्या मागणीसाठी बेमुदत उपोषणास बसला आहे.
ही पाचही आंदोलने एकाच मंडपात सुरु आहेत. उपोषणकर्त्यांनी मंडप खचाखच भरला आहे. तहसीलसमोरील या आंदोलनाची चर्चा होती. शेतमजूर, युनियनने कृषी कार्यालयासमोर, कामाच्या मागणीसाठी कॉ. मनीषा करपे यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन केले. दोनशे ते अडीचशे महिला या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या तर महावितरणसमोर गावंदरा येथील ग्रामस्थांनी वीजपुरवठा सुरु करण्याच्या मागणीसाठी उपोषण सुरु केले आहे. या वेगवेगळ्या आंदोलनामुळे शहरात मात्र चर्चेचा विषय होत आहे.

Web Title: Five fasts in one tent for various demands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.