अंबाजोगाईनजीक बायोफ्युएल प्रकल्पास भीषण आग; लाखोंचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 03:26 PM2019-05-28T15:26:33+5:302019-05-28T15:30:12+5:30

नादुरुस्त असल्याने अंबाजोगाई अग्निशमन विभागाच्या गाड्या आग विझविण्यासाठी असमर्थ ठरत आहेत.

The fierce fire in the BioFuel project; Loss of millions at Ambajogai | अंबाजोगाईनजीक बायोफ्युएल प्रकल्पास भीषण आग; लाखोंचे नुकसान

अंबाजोगाईनजीक बायोफ्युएल प्रकल्पास भीषण आग; लाखोंचे नुकसान

googlenewsNext

अंबाजोगाई (बीड ) : शहरापासून जवळच असलेल्या पिंपळा धायगुड येथील श्रीनिवास बायोफ्युएल प्रकल्पास सोमवारी मध्यरात्री भीषण आग लागली. अग्निशमन दलाचे तीन बंब आग विझविण्यासाठी अथक प्रयत्न करत असूनही अद्याप आग आटोक्यात आलेली नाही.

अंबाजोगाई येथील अतुल हराळे यांचा पिंपळा धायगुड येथे अहमदपूर रोडवर गट क्र. २६४ मध्ये ‘श्रीनिवास बायोफ्युएल’ प्रकल्प आहे. विविध कारखान्यातील बॉयलरसाठी लागणारे ‘बायोब्रिकेट’ या ठिकाणी तयार केले जातात. सोमवारी मध्यरात्री अचानक या प्रकल्पात आग लागली. जवळच प्रकल्पासाठी लागणारा कच्चा माल आणि ज्वलनशील उत्पादित माल असल्याने थोड्याच वेळात आगीन रौद्र रूप धारण केले. अंबाजोगाई येथील अग्निशमन दलाच्या कुचकामी झालेल्या गाडीवर आग आटोक्यात येणे शक्य नसल्याने परळी आणि धारूर येथील दलालाही पाचारण करण्यात आले. तरीदेखील मध्यरात्रीपासून अथक परिश्रम घेऊनही अद्याप आग धुमसतच आहे.

सध्या आणखी दोन ठिकाणच्या अग्नीशमन दलांना बोलाविण्यात आले असून त्यानंतर या आगीवर नियंत्रण मिळवता येऊ शकेल. दरम्यान, ही आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी त्यामागे शॉर्ट सर्किट हे कारण असू शकते असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या आगीमुळे आतापर्यंत लाखों रुपयांचे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे.सुदैवाने या आगीत जीवितहानी झाली नाही. 

अंबाजोगाईचे अग्निशमन दल कुचकामी :
अंबाजोगाई नगर परिषदेच्या अग्निशमन दलासाठी दोन बंब मंजूर आहेत. या गाड्यात सध्या अनेक तांत्रिक अडचणी आहेत. त्यांची नियमित देखभाल होत नाही. गाड्यांचे टायर खराब झाले असून स्टेपनी देखील नाही. पाणी मारण्याच्या गन देखील खराब झाल्या आहेत. पाईप आखूड असल्याने दूरपर्यंत पाण्याचा मारा करता येत नाही. तसेच, इंजिनमधेही बिघाड असल्याने गाडी हळू धावते. त्यामुळे या गाड्या आग विझविण्यासाठी असमर्थ ठरत आहेत. अचानक काही दुर्घटना घडली तर या कुचकामी अग्निशमन दलामुळे मोठे नुकसान आणि जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच दलाने काही वर्षापूर्वी शहरात घडलेल्या आगीच्या दुर्घटनात लक्षणीय कामिगिरी केली होती. मात्र, मागील एक-दोन वर्षात या विभागाचा बोजवारा उडाला आहे.

Web Title: The fierce fire in the BioFuel project; Loss of millions at Ambajogai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.