ग्राहकांअभावी सुका मेव्याच्या बाजारपेठेचीच तब्येत रोडावली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 12:51 AM2018-12-25T00:51:27+5:302018-12-25T00:52:11+5:30

ग्राहकांतून पुरेशी मागणी नसल्याने काजु, बदामाचा हलवा तयार होत नसल्याने बाजारपेठ सुस्तावली आहे

Due to the demand of the customers, health of the dryfruit market declining | ग्राहकांअभावी सुका मेव्याच्या बाजारपेठेचीच तब्येत रोडावली !

ग्राहकांअभावी सुका मेव्याच्या बाजारपेठेचीच तब्येत रोडावली !

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : थंडीच्या मोसमात सुका मेव्याला नेहमी मागणी असते. परंतू यंदा दिवाळीपासून बाजारात ग्राहकी थंडावलेली आहे. मागील चार महिन्यात भावही स्थिर आहेत. परंतू ग्राहकांतून पुरेशी मागणी नसल्याने काजु, बदामाचा हलवा तयार होत नसल्याने बाजारपेठ सुस्तावली आहे.
थंडीच्या दिवसात पौष्टीक असलेल्या बदामाचा हलवा घरोघरी बनविला जातो. त्याचबरोबर इतर सुकामेव्यांचा या हलव्यात वापर केला जातो. दिवाळीपासून मागील दीड महिन्यात बाजारात मंदीचा प्रभाव आहे. मागील चारपाच महिन्यात सुका मेव्याच्या दरातही तेजी नसल्याने भाव स्थिर आहेत. असे असलेतरी यंदा विविध कारणांमुळे सुका मेव्याचा हलवा खाण्याची व त्यासाठी सुका मेवा खरेदी करण्याची मानसिकता घटल्याचे दिसत आहे. तर बाजारात चांगली मागणी येईल या आशेने मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांनी गुंतवणूक करीत सुका मेवा उपलब्ध केला आहे.
दिवाळीपासून भाव उतरले
किराणा बाजारात दिवाळीपासून तेल, साबुदाणा, पोहे, शेंगदाण्याचे भाव किलोमागे पाच रुपयांनी घसरलेले आहेत.
दिवाळी नंतर भाव तेजीत
सध्या मूग डाळ ८० रुपये, तूर, उडीद ७५ तर चणा व मसूर डाळीचे भाव ६५ रुपये किलो आहेत. दिवाळीनंतर मात्र डाळींच्या दरात तेजीचे वारे राहिले. सर्वच डाळींमध्ये किलोमागे दहा रुपयांनी तेजी आली. २६०० रुपये क्विंटल मिळणा-या गव्हाचे भाव २८०० रुपये आहेत. परिणामी यावर आधारित आटा, रवा आणि मैद्याच्या दरात क्विंटलमागे २०० रुपयांची वाढ झाली आहे. पावसाअभावी खरीप व रबी हंगाम वाया गेल्याने बाजारपेठेत हा परिणाम दिसत आहे.
किसमिस वधारली
मागील वर्षी द्राक्षांचे उत्पादन घटल्याने किसमिसच्या दरात किलोमागे १०० रुपये किलोने वधारले आहेत. अफगाण किसमिसचे भाव ४०० रुपये तर भारतीय किसमिसचे भाव ३०० रुपये किलो आहेत. बाजारात अपेक्षेनुसार ग्राहकी नसल्याचे व्यापा-यांनी सांगितले. सुकामेवा खरेदीसाठी अतिरिक्त तरतूद करावी लागते. ते नाही खाल्ले तर काही फरक पडत नाही, अशी मानसिकता सध्या दुष्काळजन्य स्थितीमुळे आहे. त्यात ग्रामीण ग्राहक नसल्यासारखेच आहे.

Web Title: Due to the demand of the customers, health of the dryfruit market declining

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.