‘ध्यास गुणवत्तेचा, शोध गुणवतांचा’ उपक्रमातून संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 12:40 AM2018-10-22T00:40:36+5:302018-10-22T00:41:20+5:30

शनिवारी रेवकी, उमापूर केंद्र तथा निवडक अधिकारी व शिक्षकांची शिक्षण परिषद शहरातील सेंट झेविअर्स शाळा येथे पार पडली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, व इतर अधिकाºयांनी प्रश्नोत्तराच्या रुपाने शिक्षकांशी संवाद साधला.

Dialogue from 'Attainment of Quality, Search Quality' program | ‘ध्यास गुणवत्तेचा, शोध गुणवतांचा’ उपक्रमातून संवाद

‘ध्यास गुणवत्तेचा, शोध गुणवतांचा’ उपक्रमातून संवाद

Next
ठळक मुद्देशिक्षण परिषद : अधिकाऱ्यांसोबत शिक्षकही झाले बोलते ; साडेतीनशे शिक्षक-शिक्षिकांची होती उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्क
गेवराई : शनिवारी रेवकी, उमापूर केंद्र तथा निवडक अधिकारी व शिक्षकांची शिक्षण परिषद शहरातील सेंट झेविअर्स शाळा येथे पार पडली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, व इतर अधिकाºयांनी प्रश्नोत्तराच्या रुपाने शिक्षकांशी संवाद साधला.
यावेळी उपमुख्यकार्यकारी अधिकारी धनवंतकुमार माळी, शिक्षणाधिकारी राजेश गायकवाड, गटविकास अधिकारी के.एम. बागुल, गटशिक्षणाधिकारी आनंद मसरे, प्रवीण काळमसह अनेकजण उपस्थित होते. अमोल येडगे यांनी प्रश्न-उत्तराच्या रूपाने उपस्थितांशी संवाद साधला. संवादाच्या माध्यमातून प्रत्येकाला अंर्तमुख होण्यास प्रेरित केले. इयत्ता ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेची पूर्वतयारी म्हणून यापुढे इयत्ता ४ थी व ७ वी वर्गासाठी जिल्हास्तरावर शिष्यवृत्ती परीक्षा होणार, असे सूचित केले. संवादामुळे शिक्षकांमध्ये चैतन्य निर्माण झाले.
रेवकी केंद्रातील १५ शाळांचे मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य तथा शिक्षकांच्या मदतीने ३ लक्ष रुपयांच्या खरेदी केलेल्या बूट, सॉक्स, जीन्स पँट व टी-शर्ट इत्यादी साहित्याचे वितरण पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्ह्यातील पहिली बुलबुल कॅडेट राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त व लोकसहभागातून पहिली विज्ञान प्रयोगशाळा उभारणारी शाळा तथा सृजनशील कार्य करणाºया राक्षसभुवन स्टाफचा पाहुण्यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
प्रवीण काळम यांनी पुरस्कार रूपात मिळालेले २१ हजार रुपये प्रयोगशाळा उभारण्याकरिता मदत निधी म्हणून वितरण केले. शिक्षण परिषदेत धर्मराज करपे, विशाल कुलकर्णी आदींनी सखोल मार्गदर्शन करताना शिक्षकांनी विद्यार्थ्यांना उपयोगी पडेल, असे ज्ञान देऊन त्यांचा अभ्यासाकडे कल वाढवावा, असे आवाहन यावेळी केले. सूत्रसंचालन जे.एन.जाधव, प्रास्ताविक प्रवीण काळम तर आभार प्रदर्शन गौरी पानखडे या विद्यार्थिनीच्या कविता गायनाने करण्यात आले. या शिक्षण परिषदेस ३५० शिक्षक - शिक्षिका आदी उपस्थित होते.

Web Title: Dialogue from 'Attainment of Quality, Search Quality' program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.