अंबाजोगाई जिल्हा निर्मितीसाठी निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 12:11 AM2018-09-20T00:11:15+5:302018-09-20T00:12:03+5:30

मागील दोन पिढयांपासून प्रलंबित असलेल्या अंबाजोगाई जिल्हा निर्मितीच्या मागणीकडे प्राधान्याने लक्ष देऊन लवकरात लवकर अंबाजोगाई जिल्हा निर्मिती करावी, अशी मागणी करत अ‍ॅड. संतोष लोमटे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली.

Demonstrations for creation of Ambajogai District | अंबाजोगाई जिल्हा निर्मितीसाठी निदर्शने

अंबाजोगाई जिल्हा निर्मितीसाठी निदर्शने

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : मागील दोन पिढयांपासून प्रलंबित असलेल्या अंबाजोगाई जिल्हा निर्मितीच्या मागणीकडे प्राधान्याने लक्ष देऊन लवकरात लवकर अंबाजोगाई जिल्हा निर्मिती करावी, अशी मागणी करत अ‍ॅड. संतोष लोमटे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. त्यानंतर जिल्हा निर्मितीच्या मागणीचे निवेदन उपजिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांना देण्यात आले.
अंबाजोगाई जिल्हा निर्मितीची मागणी १९६२ पासून सातत्याने होत आहे. भौगोलिकदृष्ट्या अंबाजोगाई हेच ठिकाण जिल्ह्यासाठी अत्यंत योग्य असल्याचेही विविध सर्वेक्षणात आढळून आले आहे. तसेच जिल्ह्यासाठी आवश्यक जवळपास सर्व कार्यालये अंबाजोगाईमध्ये आहेत. जिल्हा निर्मिती संदर्भात प्रशासकीय पातळीवरून चाचपणी होऊन जिल्हा निर्मितीसाठी अंबाजोगाई पात्र असल्याचा अहवाल मुख्य सचिवांना देण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे शासनाने यांनी अंबाजोगाईकरांच्या भावनांचा आदर करून जिल्हा घोषित करावा अशी मागणी अ‍ॅड. लोमटे यांनी केली आहे.
निवेदनावर अ‍ॅड. जयसिंग चव्हाण, अ‍ॅड. माधव जाधव, भैरवनाथ देशमुख, वैजनाथ देशमुख, निशिकांत पाचेगावकर, अभिजीत जोंधळे, नामदेव गुंडाळे, अमृत महाजन, प्रा. शैलेश जाधव, अ‍ॅड. प्रशांत शिंदे, प्रशांत आदनाक, प्रवीण जायभाये, मनोज लोढा, ललित झिरमिरे, अनिकेत देशपांडे, महेश आंबाड, अमोल विडेकर, रणजित मोरे, गोविंद टेकाळे, अंकुर मोरे, अमोल गोस्वामी, अकबर जहागीरदार, परमेश्वर सोनवणे, लक्ष्मीकांत ठोके, विजयकुमार बामणे, मनेश गोरे, अविनाश मेहता, परशुराम मेहता, आर.ए. सय्यद यांच्या सह्या आहेत.

Web Title: Demonstrations for creation of Ambajogai District

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.