बीड जिल्ह्यात एकतर्फी प्रेमातून पेटवून दिलेल्या तरूणीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 12:35 AM2018-01-06T00:35:38+5:302018-01-06T00:35:47+5:30

लग्नास नकार दिल्याच्या रागातून पेटवून दिलेल्या प्रज्ञा उर्फ सोनाली सतीश मस्के (१७, रा. सोनवळा) या तरूणीचा शुक्रवारी रात्री ८.१५ वाजता मृत्यू झाला. याप्रकरणात चारही आरोपींना आधीच अटक झाली आहे.

Death of a teenage boy in Beed district with one-off love | बीड जिल्ह्यात एकतर्फी प्रेमातून पेटवून दिलेल्या तरूणीचा मृत्यू

बीड जिल्ह्यात एकतर्फी प्रेमातून पेटवून दिलेल्या तरूणीचा मृत्यू

googlenewsNext

अंबाजोगाई (जि. बीड) : लग्नास नकार दिल्याच्या रागातून पेटवून दिलेल्या प्रज्ञा उर्फ सोनाली सतीश मस्के (१७, रा. सोनवळा) या तरूणीचा शुक्रवारी रात्री ८.१५ वाजता मृत्यू झाला. याप्रकरणात चारही आरोपींना आधीच अटक झाली आहे.

सोनवळा गावातीलच महादेव जालिंदर घाडगे या तरुणाने प्रज्ञाला लग्नासाठी मागणी घातली होती. परंतु तिने नकार दिला होता. १६ डिसेंबर रोजी प्रज्ञाची आजी लाईट बिल भरण्यासाठी अंबाजोगाईला आली होती तर एक भाऊ शाळेत आणि एक भाऊ चुलत्याकडे गेलेला होता. तिचे आई-वडील ऊसतोडीसाठी अन्य जिल्ह्यात गेलेले असल्याने ती घरी एकटीच होती. दुपारी चारच्या सुमारास आरोपी महादेव जालिंदर घाडगे, त्याची आई कविता जालिंदर घाडगे, मामा बबन नरहरी मस्के आणि मामी सुवर्णा बबन मस्के या चौघांनी रॉकेल ओतून प्रज्ञाला पेटवून दिले होते. या घटनेत प्रज्ञा ६१ टक्के भाजली होती. तिच्यावर अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात उपचार सुरु होते. शुक्रवारी रात्री तिने अखेरचा श्वास घेतला.

आरोपींना कडक शिक्षा करा...
चारही आरोपींवर धारूर पोलिसात कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक करण्यात आली होती. आता प्रज्ञाच्या मृत्यूनंतर कलमात वाढ होण्याची शक्यता आहे. सर्व आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना कडक शिक्षा द्यावी, अशी मागणी प्रज्ञाच्या नातेवाईकांनी केली आहे.

Web Title: Death of a teenage boy in Beed district with one-off love

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.