उर्ध्व कुंडलिका प्रकल्पातील मासे अज्ञातकारणाने मृत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 05:26 PM2018-06-30T17:26:55+5:302018-06-30T17:27:52+5:30

उपळी, गावंदरा येथील उर्ध्व कुंडलिका प्रकल्पामधील मासे अज्ञात कारणाने मृत पावली आहेत.

Dead fish in the urdhav kundalika project | उर्ध्व कुंडलिका प्रकल्पातील मासे अज्ञातकारणाने मृत

उर्ध्व कुंडलिका प्रकल्पातील मासे अज्ञातकारणाने मृत

googlenewsNext
ठळक मुद्देप्रकल्पातील पाण्यावर हि मासे तरंगताना दिसत असून यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. 

बीड : उपळी, गावंदरा येथील उर्ध्व कुंडलिका प्रकल्पामधील मासे अज्ञात कारणाने मृत पावली आहेत. प्रकल्पातील पाण्यावर हि मासे तरंगताना दिसत असून यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. 

जिल्ह्यातील उपळी, गावंदरा येथील उर्ध्व कुंडलिका प्रकल्पातील सर्व मासे अज्ञात कारणाने मृत पावल्याची घटना आज उघडकीस आली. पाण्यात या मृत मास्यांचा खच पडला असल्याने या भागात प्रचंड दुर्गंधी सुटली आहे. तसेच यामुळे प्रकल्पातील पाणी दुषित होत आहे. उपळी, गावंदरा या दोन्ही गावांना याच प्रकल्पावरील पाणी पिण्यासाठी वापरले जाते. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. हा मध्यम प्रकल्प असून दहा ते बारा किंमी अंतरापर्यंत पाण्याचा उसावा (बॅकवॉटर) असतो.
 

Web Title: Dead fish in the urdhav kundalika project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.