बोंडअळीनंतर लष्करीचा प्रादुर्भाव वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 12:22 AM2019-05-18T00:22:13+5:302019-05-18T00:22:53+5:30

जिल्ह्याचे मुख्य पीक असलेल्या कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव मागील दोन हंगामात सलग झाला आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात उत्पादनात घट झाली होती.

After the bollworm, there will be an increase in the military | बोंडअळीनंतर लष्करीचा प्रादुर्भाव वाढणार

बोंडअळीनंतर लष्करीचा प्रादुर्भाव वाढणार

Next

बीड : जिल्ह्याचे मुख्य पीक असलेल्या कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव मागील दोन हंगामात सलग झाला आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात उत्पादनात घट झाली होती. त्यानंतर यावर्षी लष्करी अळीचा प्रदुर्भाव होण्याची भीती कृषी विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी आतापासून उपाययोजना करण्याची गरज असून, कृषी विभागाकडून याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनजागृती केली जात आहे.
कापूस पिकावर बोंडअळी, उसाला हुमणी या अळ््यांमुळे शेतकऱ्यांचे मागील दोन हंगामात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. हे संकट कमी होत असतानाच जिल्ह्यात मका या पिकावर लष्करी नावाची अळी दिसून आली आहे. अळीचा प्रादुर्भाव जवळपास ८० पिकांवर होत असून, खरीप हंगामातील पिकांवर याचा प्रादुर्भाव होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. यासाठी शेतकºयांनी खरीप हंगामापूर्वीच योग्य ती काळजी घेऊन मशागत केली तर या लष्करी अळीला अटकाव घातला जाऊ शकतो. तसेच पिकांचे नुकसान टाळता येऊ शकते. त्यामुळे यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे.
शेतकºयांनी अशी घ्यावी काळजी
खरीप हंगामातील पीक पेरणीचे दिवस जवळ येत असून, मशागत सुरु आहे. नांगरट खोल करावी. गाव किंवा परिसरातील शेतकºयांनी योग्य वेळी व शक्यतो एकाच आठवड्यात पिकांची पेरणी किंवा लागवड करावी. तसेच सलग पिके घेण्याएवजी आंतरपिके घ्यावेत. त्यामुळे या किडीच्या पतंगाला अंडी घालण्यास मज्जाव निर्माण होतो. पक्षी अळीला खात असल्यामुळे त्यांच्या थाब्यांसाठी पिकात बांबू उभारावेत. फवारणीसाठी निंबोळी अर्क घरी तयार करुन पिकांवर फवारला तर फायदा होऊ शकतो. तसेच कापूस पिकावर मोठ्या प्रमाणात औषधांची फवारणी केली जात असल्यामुळे खरीपातील सोयबीन, मूग, उडीद, खरीप ज्वारी यासह इतर पिकांवर लष्करीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. मात्र, शेतकºयांनी पीक पेरणीपूर्वीपासून योग्य नियोजन केले तर लष्करीसह इतर प्रादुर्भाव टाळता येऊ अशी माहिती बीड तालुका कृषी अधिकारी दिलीप जाधव यांनी दिली.
आळा घालण्यासाठी शेतकºयांनी परिसरातील कृषी अधिकाºयांचे मार्गदर्शन घ्यावे
दुष्काळी परिस्थिती, पिकांवरील रोग व कीडीचा प्रादुर्भाव यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. परंतु हे संकट कमी होताना दिसत नाही.
बोंडअळी व हुमणी अळीचा प्रादुर्भाव योग्य फवारणी व उपाययोजनांमुळे काही प्रमाणात कमी होत असतानाच, लष्करी अळीच्या प्रादुर्भावाचे संकट पिकांवर घोंगावत आहे.
याला आळा घालण्यासाठी शेतकºयांनी कृषी विभागाच्या संबंधित अधिकाºयांचे मार्गदर्शन घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात असे आवाहन कृषी विभागाने केल्याचे ‘आत्मा’चे संचालक बी. एम. गायकवाड यांनी सांगितले.

Web Title: After the bollworm, there will be an increase in the military

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.