फ्लॅट विक्रीत ५ लाखांचा गंडा, बिल्डरसह नगररचनाकारावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2019 12:46 AM2019-06-30T00:46:19+5:302019-06-30T00:46:40+5:30

फ्लॅट घेण्यासाठी करारनामा व ५ लाख रुपये देऊन देखील ताबा व पैसे देण्यास नकार दिल्यामुळे बिल्डरसह सहायक नगर रचनाकारावर बीड शहर पोलीस ठाण्यात शुक्रवारी उशिरा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

5 lakhs of money in flat sale, corporator's plaintiff with builder | फ्लॅट विक्रीत ५ लाखांचा गंडा, बिल्डरसह नगररचनाकारावर गुन्हा

फ्लॅट विक्रीत ५ लाखांचा गंडा, बिल्डरसह नगररचनाकारावर गुन्हा

Next
ठळक मुद्देप्लॉटची जागा वाढली  : पोलिसांनी योग्य तपास केला तर मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता

बीड : फ्लॅट घेण्यासाठी करारनामा व ५ लाख रुपये देऊन देखील ताबा व पैसे देण्यास नकार दिल्यामुळे बिल्डरसह सहायक नगर रचनाकारावर बीड शहर पोलीस ठाण्यात शुक्रवारी उशिरा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
बिल्डर उमर मुश्ताक फारोखी व नगरपरिषदेचे सहायक नगर रचनाकार एजाज खान अशी आरोपींची नावे आहेत. सय्यद फिरोज सय्यद रहेमतुल्ला (रा. बीड) हे औरंगाबाद येथील विमानतळावर शासकीय नोकरीत कार्यरत आहेत. २०१५ साली त्यांनी बीडमध्ये फ्लॅट खरेदीचा व्यवहार केला होता. ३० जून २०१५ रोजी त्यांनी झमझम कॉलनीत फ्लॅट खरेदी व्यवहारासाठी उमर मुश्ताक फारोखी यांना ५ लाख रुपये देऊन १०० रुपयांच्या बँडवर नोटरी करुन करारनामा केला होता. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर दोन वर्षांत फ्लॅटचा ताबा देण्याचे त्यात नमूद होते. मात्र, दोन वर्षे उलटून गेल्यानंतरही सय्यद फिरोज यांना उमर फारोखी याने फ्लॅटचा ताबा देण्यास नकार दिला. त्यानंतर फिरोज यांनी पैसे परत देण्याची मागणी केली तेव्हा पैसे देण्यास देखील मुश्ताक फारोकी याने टाळाटाळ केली.
त्यानंतर अनेक वेळा ५ लाख परत देण्याची मागणी सय्यद फिरोज सय्यद महेमतुल्ला यांनी केली मात्र, त्यांना पैसे व फ्लॅट देण्यास वेळोवेळी नकार दिला. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. न.प.चे सहायक नगर रचनाकार एजाज खान तौफिकयार खान याच्या संगनमताने उमर मुश्ताक फारूखी याने खोटे दस्ताऐवज तयार करुन अनेकांना गंडा घातल्याचे सय्यद फिरोज यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे. याप्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
क्षेत्रफळ वाढले, योग्य तपासाची मागणी
उमर फारुखी याने खरेदी केलेल्या भूखंडाच्या खरेदीखतावर एकूण क्षेत्रफळ ९५७. १२ चौरस मिटर एवढे आहे. मात्र, पालिकेने त्यास १०७५ चौरस मीटर क्षेत्रफळाचा पीटीआर दिला. यावरुन न.प.मधील अधिकारी पैसे खाऊन कागदोपत्री क्षेत्रफळ वाढवून देतात, तसेच सहायक नगररचनाकार अधिकऱ्यावर गुन्हा देखील दाखल झाला आहे. त्यामुळे पोलिसांनी योग्य कार्यवाही करुन तपास केला तर अशा प्रकारे नगररचनाकाराने किती ठिकाणी क्षेत्रफळ वाढवले आहे, हे समोर येईल.

Web Title: 5 lakhs of money in flat sale, corporator's plaintiff with builder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.