बीड जिल्ह्यात १५७ ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर; नव्या चेह-यांना संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 12:27 AM2017-12-28T00:27:52+5:302017-12-28T00:31:04+5:30

मागील पाच वर्षांतील विकास पाहता यावेळेस मतदारांनी जुन्या पदाधिकारी, नेत्यांना धक्के देत नव्या चेह-यांना संधी दिली. दुस-या टप्प्यातील १६२ ग्रामंपचायत निवडणुकीत विजयी उमेदवारात सर्वात जास्त उमेदवार हे तरूण व नवे आहेत. मातब्बदरांना धक्के बसले. पैकी पाच ग्रा.पं. बिनविरोध आल्या होत्या.

157 Gram Panchayats will be announced in Beed district; Opportunities for newcomers | बीड जिल्ह्यात १५७ ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर; नव्या चेह-यांना संधी

बीड जिल्ह्यात १५७ ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर; नव्या चेह-यांना संधी

googlenewsNext
ठळक मुद्देअनेक ठिकाणी मातब्बरांना धक्के

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : मागील पाच वर्षांतील विकास पाहता यावेळेस मतदारांनी जुन्या पदाधिकारी, नेत्यांना धक्के देत नव्या चेह-यांना संधी दिली. दुस-या टप्प्यातील १६२ ग्रामंपचायत निवडणुकीत विजयी उमेदवारात सर्वात जास्त उमेदवार हे तरूण व नवे आहेत. मातब्बदरांना धक्के बसले. पैकी पाच ग्रा.पं. बिनविरोध आल्या होत्या.

माजलगाव तालुक्यातील मंजरथमध्ये अवघ्या २५ वर्षीय ऋतुजा आनंदगावकर ही युवती सरपंच पदासाठी दोन पुरूषांचा पराभव करून विजयी झाली. तर धारूर, गेवराई व माजलगावात अनेकांना जोरदार धक्के दिले. पहिल्या टप्प्यात जसे अनपेक्षित निकाल लागले, तसेच निकाल दुस-या टप्प्यातही लागल्याचे पहावयास मिळाले. सर्व ठिकाणी निकाल प्रक्रिया शांततेत पार पडली. ठिकठिकाणी कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता.
तसेच निवडणूक विभागाच्या वतीनेही मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी योग्य प्रकारे नियोजन करण्यात आले होते.

 

माजलगावात ३४ पैकी २४ मध्ये महिलाराज
माजलगाव : तालुक्यात झालेल्या ३४ ग्रामपंचायतचे निकाल बुधवारी जाहीर झाले. या निवडणूकीत अनेक मातब्बर उमेदवारांना धुळ चारत युवकाना संधी दिली. ३४ पैकी २४ ग्रामपंचायतवर महिलांना सरपंच होण्याची संधी मिळाली.
तालुक्यात ३४ ग्रामपंचायत साठी ८२ टक्के मतदान झाले. अनेक ठिकाणी प्रतिष्ठेची व अटीतटीची लढाई होवून मातब्बरांना मात दिल्याचे चित्र पाहावयास मिळाले. तर अनेक ठिकाणी सरपंच एका गटाचा तर सदस्य एका गटाचे आल्याने ‘कही खुशी कही गम’ असे वातावरण होते. यामध्ये ३४ सरपंच पदापैकी आ.आर.टी.देशमुख गटाचे १८, माजी मंत्री प्रकाश सोळंके २४ तर मोहन जगताप यांच्या गटाचे ११ जागेवर सरपंच पदाचे उमेदवार विजयी झाल्याचे दावे केले आहेत.

बीडमध्ये नऊपैकी सहा ग्रा.पं.वर महिला राज
बीड : तालुक्यातील ९ पैकी ६ ग्रामपंचायतींवर महिलाराज आले आहे. तर ग्रामपंचायती ताब्यात आल्याचा दावा आ. क्षीरसागर आणि आ. मेटे गटांनी केला आहे.
तालुक्यातील ९ ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि सदस्यपदासाठी दुसºया टप्प्यात निवडणूक झाली. त्यापैकी नेकनूर, ढेकणमोहा तांडा, धावज्याची वाडी, लक्ष्मीआई तांडा, पांढºयाची वाडी, पोखरी घाट ग्रामपंचायतीचा कारभार महिला सरपंच सांभाळणार आहेत. ढेकणमोहा तांडा ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच झूमलाबाई पवार आणि दयाराम पवार, बाबू पवार, आशा राठोड, संगिता पवार, सुमन पवार, एकनाथ आडे, मथुराबाई राठोड हे ७ सदस्य बिनविरोध निवडून आले. तर बाळापूर ग्रामपंचायतीमध्ये प्रभाग २ मधील अर्चना गालफाडे, द्रौपदी पवार, प्र. ३ मधील सुभाष लोखंडे, सुमन कदम हे चार सदस्य बिनविरोध निवडून आले. बीड तालुक्यातील ९ पैकी ४ ग्रामपंचायतीवर शिवसंग्रामचा झेंडा फडकला आहे. दुसºया टप्प्यात नेकनूरसह धावज्याची वाडी, पांढºयाची वाडी आणि बाळापूर ग्रामपंचायतीवर शिवसंग्रामचा झेंडा फडकला असून आ. विनायक मेटे यांचे बालाघाटावरील वर्चस्व पुन्हा सिध्द झाल्याचा दावा त्यांच्या समर्थकांनी केला आहे.

तर या निवडणुकीत बीड मतदार संघातील ८ ग्रामपंचायती ताब्यात आल्या असून आ.जयदत्त क्षीरसागर यांनी पुन्हा वर्चस्व सिध्द केल्याचा दावा समर्थकांनी केला. प्रारंभी ढेकणमोहा तांडा ग्रामपंचायत बिनविरोध तर बुधवारी निकालानंतर मोरगांव, पोखरी, आर्वी, जांब, शिरापूर धुमाळ, हिवरसंगा-औरंगपूर, लक्ष्मीआई तांडा या ग्रामपंचायती ताब्यात आल्याचा दावा आ. क्षीरसागर गटाने केला आहे.

आष्टीत चिठ्ठीने अजमावले नशीब
आष्टी : तालुक्यातील दुस-या टप्यात म्हसोबाचीवाडी, नागतळा, वंजारवाडी, हाकेवाडी या चार ग्रामपंचायतच्या निवडणूका शांततेत पार पडल्या. यामधे नागतळा ग्रामपंचायत सरपंच पदावर रंजना गुणवंत सुर्यवंशी यांची बिनविरोध निवड झाली तर उर्वरीत तीन ग्रामपंचायत निवडणूक सदस्यांच्या निवडणुकीत सहा उमेदवार बिनविरोध झाले. वंजारवाडी वार्ड क्र.१ मधून ना.म.प्र.च्या जागेसाठी उत्तम महाजन व भीमराव महाजन यांना २१८ इतकी बरोबरीची मते मिळाली. त्यामुळे चिठ्ठी काढण्यात आली. यामध्ये उत्तम महाजन विजयी झाले. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून एस.जी.सिंगनवाड व पी.के.माडेकर यांनी काम पाहिले. तर रुई नालकोल, कोयाळ, सांगवी (आष्टी) या तीन गावच्या ग्रामपंचायतचा कार्यकाळ संपत आला असून, दोन महिण्याच्या अवधीत निवडणुका होणार आहेत.

शिरूर कासारला अनेकांचा वाट्याला आला अपेक्षाभंग
शिरूर : दुस-या टप्प्यातील २० ग्रा.पं.पैकी एक सरपंच बिनविरोध निघाला. उर्वरित १९ सरपंच पदाचा निकाल बुधवारी घोषित झाला. निकालानंतर अनेकांचा अपेक्षाभंग झाला तर विजयाचा आनंद गुलालाची उधळण करुन उपभोगला.
अत्यंत चुरशीच्या लढतीत अत्यंत कमी मताने काहींना पराभूत व्हावे लागले, तर राक्षसभुवन ग्रा.पं. सरपंचपदी माधुरी तांबे या बिनविरोध आल्या होत्या. दहीवंडीच्या विद्यमान सरपंच शिलाताई आघाव यांनी लोकमतातून देखील बाजी मारली असून त्या दुसºयांदा सरपंचपदी विराजमान झाल्या. आ. भीमराव धोंडे यांचे स्वीय सचिव भागवत वारे हे निवडून आले. तिंतरवणी विद्यमान जि. प. सदस्याच्या पॅनलला हार पत्करावी लागली. पिंपळनेरमध्ये पहिल्यांदाच बबनराव जायभाये सरपंच म्हणून निवडले गेले. पाडळीत जि. प.मध्ये पराभूत रामदास हंगे यांनी सरपंचपद मिळवले.
निकाल घोषित झाल्यानंतर पाडळी, आर्वी येथे काहीसा अनुचित प्रकार घडला. आर्वी येथील महिला पुरुष उशिरापर्यंत पोलीस स्टेशनला होते. गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

गेवराईत राष्ट्रवादी, शिवसेनेची बाजी
गेवराई : दुस-या टप्प्यात तालुक्यातील ३१ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी ८४ टक्के मतदान झाले होते. याची मतमोजणी बुधवारी सकाळी तहसिल कार्यालयात झाली. यामध्ये शिवसेना १२ जागेवर तर राष्ट्रवादी पक्षाने १५ ग्रामपंचायतीच्या जागेवर दावा केला आहे. भाजपाने ५ तर अपक्षाने उमापुर व चकलांबा व अन्य एक ठिकाणी बाजी मारली आहे. या निवडणुकीत शिवसेना व राष्ट्रवादीने बाजी मारली तर भाजपा पिछाडीवर राहिला.
तालुक्यातील ३२ पैकी १ ग्रामपंचायत बिनविरोध निघाली होती. त्यामुळे ३१ ग्रामपंचायतसाठी मतदान झाले होते. सर्वात मोठ्या असलेल्या चकलांबा व उमापुर येथील ग्रामपंचायतीवर अपक्षाने बाजी मारली. सर्वच ठिकाणी अटी तटीच्या लढती पहायला मिळाल्या मात्र या निवडणुकीत शिवसेना व राष्ट्रवादी ने बाजी मारली तर भाजपा पिछाडीवर राहिले आहे. निवडुण आल्या नंतर विजयी उमेदवारानी गुलालाची उधळण करून जल्लोष साजरा केला. निकालाच्या वेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

धारूरमध्ये प्रस्थापितांना दिला धक्का
धारूर : तालुक्यातील भोगलवाडी, पिंपरवाडा, धुनकवाड, सुरनरवाडी या ग्रामपंचायतीच्या निवडणूका चुरशीच्या झाल्या होत्या. याकडे राजकीय नेत्यांनी लक्ष दिले होते. तिनही निवडनुकीमध्ये १५ ते २० वर्षानंतर परिवर्तन झाले आहे. भोगलवाडी, पिंपरवडा व सुरनरवाडी येथे भाजपाचा गड ढासळला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपमधील गटबाजीचा फायदा घेऊन तालूक्यात जोरदार मुंसडी मारली आहे
दुसºया टप्प्यात ग्रामपंचायतीच्या निवडनुका चुरशीच्या झाल्या होत्या. बुधवारी मतमोजणीच्या दिवशी निकालानंतर अनेक ग्रामपंचायतीमध्ये परिवर्तन झाल्याचे दिसून आले. भोगलवाडी ग्रामपंचायतीमध्ये तब्बल दहा वर्षानंतर परिवर्तन झाले. ही ग्रामपंचायत राष्ट्रवादी कॉग्रेसच्या जी.प. सदस्या भारती लालासाहेब तिडके यांच्या ताब्यात गेली आहे. भाजपातील एका गटाला सोबत घेऊन त्यांनी यश संपादन केले आहे. तर धुनकवाड येथे १५ वर्षानंतर सत्ता बदल झाला आहे. येथे भाजपाच्या गटाकडे सत्ता गेली असून येथे आ. आर.टी. देशमुख, माजी आ. केशव आंधळे यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. भाजपा तलाुकाध्यक्ष सर्व तालूका वाºयावर सोडून या गावात तळ ठोकून होते. पिंपरवाडा ही ग्रा.पं. अनेक वर्षांपासून भाजपच्या ताब्यात होती. परंतु यावेळी परिवर्तन होऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात गेली आहे. सुरनरवाडी ही ग्रा.पं. भाजपाचे आशोक करे यांच्या ताब्यात होती. येथेही २० वर्षानंतर परिवर्तन होऊन राकॉच्या ताब्यात गेली आहे.
दुसºया टप्प्यात ९ ग्रामपंचायती राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ताब्यात गेल्या असून ४ भाजपकडे तर ४ संमिश्र आल्या आहेत.

पाटोद्यात अपहरण नाट्य करूनही पराभवच
पाटोदा : तालुक्यातील १६ ग्रामपंचायतीच्या निवडणुका शांततेत पार पडल्या. गांधनवाडी येथील सरपंच पदाच्या उमेदवार मुलाचे अपहरण नाट्य पोलिसांनी उघडे पाडले. या उमेदवार पराभूत झाल्या.
गांधनवाडी येथील सरपंच उमेदवार तुळसाबाई खाडे यांचा मुलगा महादेव खाडे याने स्वत:चे अपहरण झाल्याचे नाटक रचले. खचार्साठी पैसे नसल्याने त्याने नाटक रचले मात्र पोलिसांनी हे नाटक उघडे पाडले. उमेदवार तुळसाबाई पराभूत झाल्या. या ठिकाणी कुसुम कुमखाले विजयी झाल्या. रोहतवाडी येथील पांडुरंग नागरगोजे हे केवळ पाच मतांनी विजयी झाले ते भाजपाचे तालुका चिटणीस आहेत.

केजमध्ये भाजप-राष्ट्रवादीत रस्सीखेच
केज : तालुक्यातील दुस-या टप्प्यात एकुण २३ ग्राम पंचायतींसाठी मतदान झाले. त्यापैकी भाजपाच्या ताब्यात १० तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात ८, स्वाभिमानी शेतकरी संघटना १ आणि संमिश्र ४ याप्रमाणे निकालाचे चित्र स्पष्ट झाले. या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच दिसून आली आहे.
तहसिलदार अविनाश कांबळे यांच्या नियंत्रणाखाली सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरु झाली. या निवडणुकीत भाजपाचे रमेश आडसकर आणि संतोष हंगे यांनी अनुक्रमे आडस आणि नांदूरघाट येथील आपली सत्ता कायम ठेवली. नव्याने निर्माण झालेल्या लिंबाचीवाडी ग्राम पंचायत राष्ट्रवादी काँग्रेसचे पचायत समिती सदस्य पिंटू ठोंबरे गटाकडे गेली आहे. सुधाकर लांब गटाच्या ताब्यातील बनकरंजा, सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब केकान यांच्या ताब्यातील केकानवाडी, राष्ट्रवादी काँग्रेसचे सुदाम पाटील गटाची उंदरी या तीनही ग्राम पंचायती भाजपचे रमेश आडसकर यांनी विरोधकांच्या ताब्यातून स्वत:च्या गटाकडे खेचून

Web Title: 157 Gram Panchayats will be announced in Beed district; Opportunities for newcomers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.