एटीएमद्वारे लंपास केले १ लाख २० हजार रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 12:31 AM2018-11-29T00:31:47+5:302018-11-29T00:32:31+5:30

येथील स्टेट बँक आॅफ इंडिया शाखेतील एटीएम मध्ये एका ६५ वर्षीय पेन्शन धारकाची अज्ञात व्यक्तीने फसवणूक करत एटीएमद्वारे तब्बल १ लाख १९ हजार ५०० रुपयांची रक्कम लंपास केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. या प्रकरणी अज्ञाताविरोधात गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

1 lakh 20 thousand rupees lapsed by ATM | एटीएमद्वारे लंपास केले १ लाख २० हजार रुपये

एटीएमद्वारे लंपास केले १ लाख २० हजार रुपये

Next
ठळक मुद्देगेवराई येथील घटना : पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
गेवराई : येथील स्टेट बँक आॅफ इंडिया शाखेतील एटीएम मध्ये एका ६५ वर्षीय पेन्शन धारकाची अज्ञात व्यक्तीने फसवणूक करत एटीएमद्वारे तब्बल १ लाख १९ हजार ५०० रुपयांची रक्कम लंपास केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. या प्रकरणी अज्ञाताविरोधात गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रमाकांत भगवानराव हुलजुते (वय ६५ रा.शारदा शाळेजवळ, ताकडगाव रोड, गेवराई) हे जयभवानी सहकारी साखर कारखाना येथे लिपिक म्हणून या पदावरून निवृत्त झालेले आहेत. त्यांना मिळणारी पेन्शन त्यांचे गेवराई येथील मोंढा भागातील स्टेट बँक आॅफ इंडिया या शाखेत बचत खाते क्रमांक ३१२५००१०८१८ यामध्ये १ लाख ३७ हजार ६०० रुपये रक्कम जमा होती. दरम्यान हुलजुते यांनी २२ नोव्हेंबर रोजी स्टेट बँक आॅफ इंडिया शाखेतील एटीएम मध्ये जाऊन ५०० रुपये रक्कम काढली. यानंतर ते २३ नोव्हेंबर रोजी दुसऱ्या दिवशी एटीएममध्ये पुन्हा पैसे काढण्यासाठी गेले असता एटीएममधून रक्कम निघाली नाही. यामुळे हुलजुते यांनी त्यांच्या मुलाला याची माहिती दिली असता त्यांने बँकमध्ये माहिती घेतली असता २२ नोव्हेंबर रोजी रात्री ११.४७ वा. १९ हजार ५०० रुपये, ११.५० वा. ४० हजार, १२.०३ मि. २० हजार आणि १२.०४ मि. ४० हजार असे एकूण १ लाख १९ हजार ५०० रक्कम काढल्याचे दिसून आले. यामुळे त्यांनी खात्यावरील रक्कम गायब असल्याचे निदर्शनास येताच त्यांनी बँकेत जाऊन चौकशी केली. दरम्यान यावेळी बँक व्यवस्थापक यांनी तुमचे एटीएम कार्ड क्लोनिंग करुन फसवणूक केली असल्याचे सांगितले. दरम्यान हुलजुते यांनी आपली फसवणूक झाल्याने त्यांनी ठाण्यात जाऊन तक्रार दिली. याप्रकरणी रमाकांत हुलजुते यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दिनेश आहेर हे करत आहेत.
गेवराईच्या एसबीआय शाखेतील प्रकार
येथील सेवानिवृत्त रमाकांत हुलजते यांच्या खात्यातील १ लाख ३७ हजार ६०० रुपये रक्कम लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आल्याने बँकेत जाऊन विचारणा केली असता कार्डचे क्लोनिंग करुन फसवणूक झाल्याचे उघडकीस आले.

Web Title: 1 lakh 20 thousand rupees lapsed by ATM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.