World Badminton Championships 2018: अवघ्या 31 मिनिटांत सायनाचे आव्हान संपुष्टात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2018 01:10 PM2018-08-03T13:10:58+5:302018-08-03T13:11:21+5:30

World Badminton Championships 2018: भारताच्या सायना नेहवालला जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत धक्कादायक पराभव पत्करावा लागला.

World Badminton Championships 2018: Carolina Marin beat saina nehwal in only 31 minutes | World Badminton Championships 2018: अवघ्या 31 मिनिटांत सायनाचे आव्हान संपुष्टात

World Badminton Championships 2018: अवघ्या 31 मिनिटांत सायनाचे आव्हान संपुष्टात

googlenewsNext

नांनजिंग (चीन) - भारताच्या सायना नेहवालला जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत धक्कादायक पराभव पत्करावा लागला. स्पनेच्या कॅरोलिन मरिनने अवघ्या 31 मिनिटांत सरळ गेममध्ये सायनावर विजय मिळवला. मरिनने ही लढत 21-6, 21-11 अशी जिंकली आणि उपांत्य फेरीत प्रवेश केला.

जागतिक स्पर्धेत 2015 मध्ये रौप्य आणि 2017 मध्ये कांस्यपदक जिंकणा-या सायनाकडून राष्ट्रकुल सुवर्णपदकानंतर येथे जेतेपदाच्या अपेक्षा होत्या. मात्र, मरिनविरूद्धच्या सामन्यात तिचा संघर्ष जाणवलाच नाही. मरिनने अगदी सहजपणे सायनाला नमवले. मरिनने जलद खेळ करताना 11-2 अशी आघाडी घेतली. सायनाने गेममध्ये टिकून राहण्याचा प्रयत्न मरिनच्या खेळासमोर अपयशी ठरला. मरिनने 12 मिनिटांत हा गेम 21-6 असा घेतला.

दुस-या गेममध्ये सायना सुरूवातीचे गुण घेतले, परंतु मरिनच्या झंझावातासमोर तिला फार काळ तग धरता आले नाही. मरिनने दमदार स्मॅशचा खेळ करताना 11-8 अशी आघाडी घेतली. मरिनने 19 मिनिटांत हाही गेम 21-11 असा जिंकून सायनाचे आव्हान संपुष्टात आणले.



या पराभवानंतर सायना म्हणाली, अव्वल दर्जाच्या खेळाडूंविरूद्ध खेळताना सातत्यपूर्ण खेळ कसा करता येईल यावर मेहनत घ्यावी लागेल. सुपर सीरिज स्पर्धेत चांगली कामगिरी करता न आल्यामुळे मला अव्वल खेळाडूंविरूद्ध खेळण्याची संधी मिळालेली नाही. पुढील स्पर्धांच्या दृष्टीने मेहनतीची आवश्यकता आहे आणि मी त्यासाठी प्रयत्न करणार आहे. 

Web Title: World Badminton Championships 2018: Carolina Marin beat saina nehwal in only 31 minutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.