Jaguar launches XJ50 over five decades; Price of only 40 lakhs | जग्वारची पाच दशकांनी भारलेली XJ50 लाँच; किंमत फक्त 40 लाखांपासून
जग्वारची पाच दशकांनी भारलेली XJ50 लाँच; किंमत फक्त 40 लाखांपासून

गेली पाच दशके जगभरातील व्यावसायिक, सेलिब्रिटी, राजकारण्यांच्या पसंतीला उतरलेली जग्वार लँड रोव्हरची XJ ही आलिशान कार नव्या अवतारात भारतात नुकतीच लाँच करण्यात आली. जुन्या कारच्या नावात काहीसा बदल करून XJ 50 असे नामकरण करण्यात आले आहे.


XJ 50 ला लांब व्हीलबेस असून 3.0 लिटरचे डिझेल पॉवरट्रेनचे इंजिन देण्यात आले आहे. शिवाय आकर्षक रचना, दणकट बांधणी या कारला स्टायलिश स्पोर्टींग सलोनच्या श्रेणीतील एक उत्तम कार बनवितात. या कारला 19 इंचाचे टायर देण्याक आले आहेत. क्रोम सराऊंडसह क्रोम रेडिएटर ग्रील, मागच्या आणि बाजूच्या वेंट्सला खास बॅजिंग देण्यात आले आहे. 


XJ 50 ही आलिशान कार फुजी व्हाईट, सँटोरिनी ब्लॅक, लोअर ब्ल्यू आणि रोझेलो रेड अशा चार रंगात उपलब्ध आहे. XJ 50 च्या XE मॉडेलची 39.73 लाख,  XF 49.58 लाख,  F-PACE  63.17 लाख,  XJ 1 कोटी 2 लाख आणि F-TYPE ची सुरुवातीची किंमत 90.93 लाख रुपये एक्स-शोरुम ठेवण्यात आलेली आहे.


Web Title: Jaguar launches XJ50 over five decades; Price of only 40 lakhs
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.