बाईक, कारचे काढता! रेल्वेचे मायलेज किती? एका किमीला किती लीटर डिझेल लागते...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 12:36 PM2024-02-27T12:36:35+5:302024-02-27T12:36:59+5:30

भारतीय रेल्वेचे काहीच ट्रॅक हे विद्युतीकरण झालेले आहेत. यामुळे लांबपल्ल्याच्या गाड्यांना डिझेल इंजिने जोडावीच लागतात.

How much is the mileage of the train engine? How many liters of diesel is needed per km... | बाईक, कारचे काढता! रेल्वेचे मायलेज किती? एका किमीला किती लीटर डिझेल लागते...

बाईक, कारचे काढता! रेल्वेचे मायलेज किती? एका किमीला किती लीटर डिझेल लागते...

आजकाल इंधनाचे दर एवढे वाढलेत ना की त्यावर काही वर्षांपूर्वी एका अलिशान बोटीची मजेशीर अॅडही आली होती. करोडो रुपयांची बोट खरेदी करायला गेलेल्या ग्राहकाने त्या सेल्स पर्सनला प्रश्न विचारलाच. 'कितना देती है'... रस्तेमार्गापेक्षा महागडा असतो तो लोहमार्ग, याच मार्गावरून अनेक गोष्टींची वाहतूक वेगाने केली जाते. मग या ट्रेन किती इंधन वापरतात? तुम्हालाही प्रश्न पडतच असेल ना कधी ना कधी...

भारतीय रेल्वेचे काहीच ट्रॅक हे विद्युतीकरण झालेले आहेत. तरीही मालगाड्यांना डिझेल इंजिने सर्रास असतात. रेल्वे वेगवेगळ्या प्रकारची इंजिन वापरते. यामध्ये वजन, ताकद आणि अंतर आदी गोष्टी पाहिला जातात. ही इंजिने वेगवेगळ्या प्रकारात असल्याने त्यांचे मायलेजही वेगवेगळे असते. 

१२ डब्यांची प्रवासी ट्रेन एक किमीचे अंतर कापण्यासाठी ६ लीटर डिझेल जाळते. २४ डब्यांच्या सुपरफास्ट ट्रेनलाही तेवढेच इंधन लागते. १२ डब्यांच्या एक्स्प्रेस ट्रेनला साडे चार लीटर डिझेल लागते. कारण या ट्रेनची इंजिने वेगवेगळी असतात. कमी डब्यांच्या ट्रेनमुळे इंजिनवर कमी लोड असतो. 

पॅसेंजर ट्रेन आणि सुपरफास्ट ट्रेन जास्त इंधन जाळतात. कमी अंतरावर थांबायचे असल्यास या ट्रेनना जास्त इंधन लागते. कारण या ट्रेनना जास्त वेग घेता येत नाही. एक्सीलेटर आणि ब्रेकचा वारंवार वापर करावा लागतो. यामुळे इंधनाचा खप वाढत जातो. 

ट्रेनची इंजिन कधीच बंद केली जात नाहीत. कारण ती चालू करताना खूप जास्त इंधन जाळतात. यामुळे ती आयडियल कंडिशनला देखील सुरुच ठेवली जातात. कोकणात १०-१२ वर्षांपूर्वी रेलरोकोवेळी एका तथाकथित आक्रमक नेत्याने रेल्वेचे इंजिन बंद केले होते. त्याला रेल्वेने दीड लाखाचा इंधन वाया गेल्याचा दंड केला होता. 

Web Title: How much is the mileage of the train engine? How many liters of diesel is needed per km...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.