देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार; किंमत फक्त 1.70 लाख रुपये, पाहा फीचर्स...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2023 06:52 PM2023-11-20T18:52:30+5:302023-11-20T18:53:19+5:30

Cheapest Electric Car: भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी झपाट्याने वाढत आहे, त्यामुळे विविध कंपन्याही या क्षेत्रात उतरत आहेत.

Cheapest Electric Car: The cheapest electric car in the country; Price 1.70 Lakh only, see features... | देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार; किंमत फक्त 1.70 लाख रुपये, पाहा फीचर्स...

देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार; किंमत फक्त 1.70 लाख रुपये, पाहा फीचर्स...

Cheapest Electric Car: भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी झपाट्याने वाढत आहे. लोक पेट्रोल आणि डिझेलऐवजी इलेक्ट्रिक कार घेण्याकडे वळत आहेत. सध्या भारतीय बाजारपेठेतील बहुतांश इलेक्ट्रिक कार्सची किंमत जास्त आहे, त्यामुळे बरेच लोक या कार घेण्यास टाळाटाळ करतात. पण आम्ही तुम्हाला अशा एका इलेक्ट्रिरक कारबद्दल सांगणार आहोत, ज्याची किंमत बाईकपेक्षाही कमी आहे.

बाईकपेक्षा कमी किंमत
आम्ही ज्या कारबद्दल सांगत आहोत, त्या कारचे नाव Yakuza Karishma, असे आहे. या कारची किंमत 2 लाख रुपयांपेक्षा कमी असल्याचे सांगण्यात येत आहे. म्हणजेच तुम्हाला आता TATA NANO EV साठी थांबण्याची गरज नाही. Yakuza EV ही सिरसा, हरियाणा येथील इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनी आहे. कंपनीची Yakuza Karishma ही देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कारची एक्स-शोरूम किंमत सुमारे 1.70 लाख रुपये आहे. ही किंमत एखाद्या बाईकपेक्षाही कमी आहे. 

याकुझा करिश्मा: फीचर्स
याकुजा करिश्मा ही 3 सीटर इलेक्ट्रिक कार आहे. कारचा लुक आणि डिझाइन तुम्हाला आकर्षित करेल. या इलेक्ट्रिक कारमध्ये एलईडी डीआरएल, प्रोजेक्टर हेडलॅम्प, एलईडी फॉग लॅम्प, ब्रॉड ग्रिल, क्रोम डोअर हॅन्डल, कनेक्टेड एलईडी टेल लॅम्प, पॉवर विंडो, बॉटल होल्डर यांसारख्या फीचर्सचा समावेश आहे. यात तुम्हाला सनरूफ, पुश स्टार्ट/स्टॉप बटण, स्पीकर, ब्लोअर, इन्स्ट्रुमेंट डिस्प्ले, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा यांसारखी वैशिष्ट्येदेखील मिळतील.

याकुझा करिश्मा: बॅटरी 
याकुझाच्या इलेक्ट्रिक कारला 60v42ah बॅटरीमधून पॉवर मिळते. एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ही कार 50-60 किलोमीटर अंतर कापू शकते. ही कार 0 ते 100 टक्के चार्ज होण्यासाठी 6-7 तास लागतील. इलेक्ट्रिक कार चार्ज करण्यासाठी टाइप 2 चार्जर उपलब्ध असेल. या इलेक्ट्रिक कारची डिलिव्हरी अद्याप सुरू झालेली नाही.

Web Title: Cheapest Electric Car: The cheapest electric car in the country; Price 1.70 Lakh only, see features...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.