BYD भारतात आणखी तीन इलेक्ट्रिक कार आणण्याच्या तयारीत, जाणून घ्या काय आहे प्लॅन?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2024 06:10 PM2024-03-08T18:10:10+5:302024-03-08T18:10:50+5:30

BYD Electric Cars : मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी येत्या काही दिवसांत भारतात तीन नवीन कार लाँच करण्याची योजना आखत आहे.

BYD lines up 3 more EV launches for India | BYD भारतात आणखी तीन इलेक्ट्रिक कार आणण्याच्या तयारीत, जाणून घ्या काय आहे प्लॅन?

BYD भारतात आणखी तीन इलेक्ट्रिक कार आणण्याच्या तयारीत, जाणून घ्या काय आहे प्लॅन?

नवी दिल्ली : चीनमधील प्रमुख इलेक्ट्रिक कार निर्माता कंपनी BYD साठी भारत महत्त्वाची बाजारपेठ बनत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनी लवकरच भारतात आपला पोर्टफोलिओ वाढवण्याची योजना आखत आहे. दरम्यान, येत्या काही वर्षांत कंपनी आपल्या नवीन कार भारतात लाँच करण्याच्या तयारीत आहे. रिपोर्ट्सनुसार, चीनी इलेक्ट्रिक कंपनी BYD लवकरच भारतात आणखी नवीन कार आणू शकते. 

मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी येत्या काही दिवसांत भारतात तीन नवीन कार लाँच करण्याची योजना आखत आहे. यासह, कंपनीला पुढील तीन वर्षांत देशातील 85 टक्के इलेक्ट्रिक कार मार्केट कव्हर करायचे आहे. याशिवाय, कंपनी भारतात विस्तारावरही काम करत आहे. त्यामुळे येत्या काही काळात भारत जपानपेक्षाही मोठी बाजारपेठ म्हणून उदयास येऊ शकतो, असा विश्वास कंपनीला आहे.

इलेक्ट्रिक कंपनी BYD देशात इलेक्ट्रिक SUV Atto 3 द्वारे ARAI कडून होमोलोगेशन सर्टिफिकेट मिळविण्यावर काम करत आहे. हे सर्टिफिकेट मिळाल्यानंतर 2500 युनिट्सच्या आयातीवरील निर्बंध हटवले जातील. दरम्यान, देशामध्ये उत्पादित किंवा आयात केलेल्या सर्व वाहनांसाठी सरकारने निर्दिष्ट केलेल्या नियमांनुसार रस्त्याच्या योग्यतेसाठी वाहने प्रमाणित करण्याची प्रक्रिया म्हणजे होमोलोगेशन आहे.

कसा आहे पोर्टफोलिओ?
कंपनी BYD ने अलीकडेच भारतात नवीन इलेक्ट्रिक कार लाँच केली आहे. कंपनीने लक्झरी इलेक्ट्रिक सेडान कार BYD Seal फेब्रुवारी 2024 मध्ये 41 लाख रुपये किमतीत लाँच केली आहे. BYD सध्या भारतात तीन कार ऑफर करते. यापैकी एक सेडान Seal आहे, तर दुसरी एसयूव्ही Atto3 आणि E6 आहे. तर आगामी काळात सी लायन, टँग आणि डॉल्फिन सारख्या कारही भारतीय बाजारपेठेत आणल्या जाऊ शकतात.

Web Title: BYD lines up 3 more EV launches for India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.