‘व्हीव्हीपॅट’ यंत्रावर दिसणार कोणाला मतदान केले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 10:52 PM2018-12-15T22:52:07+5:302018-12-15T22:52:56+5:30

आगामी लोकसभा निवडणुकीत ‘ईव्हीएम’सह ‘व्हीव्हीपॅट’ यंत्राद्वारे मतदान प्रक्रिया राबविली जाणार आहे. आपण कोणाला मतदान केले ते लगेच ‘व्हीव्हीपॅट’ यंत्रावर सात सेकंद मतदारास दिसणार आहे.

Who voted to appear on the VVPat machine? | ‘व्हीव्हीपॅट’ यंत्रावर दिसणार कोणाला मतदान केले

‘व्हीव्हीपॅट’ यंत्रावर दिसणार कोणाला मतदान केले

googlenewsNext
ठळक मुद्देनिवडणुकीतील पारदर्शकता : मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनीकुमार यांनी घेतला आढावा


औरंगाबाद : आगामी लोकसभा निवडणुकीत ‘ईव्हीएम’सह ‘व्हीव्हीपॅट’ यंत्राद्वारे मतदान प्रक्रिया राबविली जाणार आहे. आपण कोणाला मतदान केले ते लगेच ‘व्हीव्हीपॅट’ यंत्रावर सात सेकंद मतदारास दिसणार आहे. या यंत्राची प्रात्यक्षिके ग्रामीण तसेच शहरी भागांत करून त्यासंबंधीची व्यापक जनजागृती करावी, असे निर्देश प्रधान सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनीकुमार यांनी आज येथे दिले.
अश्वनीकुमार यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी विभागीय आयुक्त कार्यालयात लोकसभा निवडणूक तयारीसंदर्भात आढावा बैठक झाली. या बैठकीस सहमुख्य निवडणूक अधिकारी अनिल वळवी, एस.एस. बोरकर, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्यासह विभागातील आठही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थिती होते. यावेळी त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना काही सूचना केल्या.
यावेळी अश्वनीकुमार यांनी निवडणूक प्रक्रिया निर्भय व पारदर्शक वातावरणात पार पडण्यासाठी प्रशासनाने कटाक्षाने काम करणे आवश्यक असून, आगामी लोकसभा निवडणूक ही ईव्हीएमसह व्हीव्हीपॅट यंत्राद्वारे होणार आहे. मतदारांना पारदर्शक मतदानाचा अनुभव देणाºया या यंत्रामुळे मतदान प्रक्रियेची विश्वासहार्हता वाढणार आहे. त्यामुळे या यंत्राबाबत व्यापक जनजागृती करावी. अचूक व गुणवत्तापूर्ण मतदान होण्यासाठी सर्व पात्र मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येईल, यादृष्टीने मतदार यादी शुद्धीकरण दर्जेदार होण्यास प्राधान्य द्यावे. विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादी शुद्धीकरण कार्यक्रम जिल्ह्यात राबविण्यात आला असून, त्यातून अद्ययावत केलेल्या प्राथमिक मतदार याद्यांची तपासणी मतदान केंद्र अधिकारी (बीएलओ) आणि राजकीय पक्षांच्या मतदान केंद्र प्रतिनिधींमार्फत करून सर्वार्थाने निर्दोष मतदार यादी तयार होईल, याकडे लक्ष द्यावे, अशा सूचना दिल्या.
बीएलओंनी घरोघरी जाऊन केलेल्या मतदार नोंदणी प्रक्रियेत त्यावेळी ज्या मतदारांची नोंदणी राहून गेली असेल, त्यांच्या नावांची नोंदणी मतदार यादीत कटाक्षाने करून घ्यावी. उपविभागीय आणि तहसील स्तरावर बीएलओ आणि बीएलए यांच्या बैठका घेऊन मतदार यादी तपासणी लवकरात लवकर करून घ्यावी. मतदान केंद्रांवरील सुविधांबाबत तपासणी करून आवश्यक सुविधांची उपलब्धता होण्याच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
चौकट
मयत मतदारांच्या स्वतंत्र नोंदी
मतदारांना ओळखपत्रांचे वाटप झाले आहे का, याची खातरजमा करून घ्यावी. दुबार नोंदणी झालेल्या मतदारांची त्रुटी दूर करणे, मयत आणि कायम स्थलांतरित मतदारांची नोंद ठेवणे, दिव्यांग मतदारांची नोंदणी अधिकाधिक करण्यावर भर देणे, दिव्यांग मतदारांची नावे चिन्हांकित करणे, अयोग्य आणि अस्पष्ट छायाचित्रांची दुरुस्ती करणे आदींचा आढावा घेत राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनीकुमार यांनी ही कामे काळजीपूर्वक करण्याच्या सूचना अधिकाºयांना दिल्या.

Web Title: Who voted to appear on the VVPat machine?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.