सिडको एन-१ मधील बंगल्यातून रिव्हॉल्व्हर आणि चांदीचे दागिने पळविणारे दोन चोरटे अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 11:34 PM2019-04-13T23:34:41+5:302019-04-13T23:35:04+5:30

औरंगाबाद : सिडको एन-१ येथील आरटीओ अधिकाºयाचा बंद बंगला फोडून परवानाधारक पिस्तुलासह सुमारे एक लाख रुपये किमतीची चांदीची भांडी ...

Two cops fleeing revolvers and silver jewelery in CIDCO N-1 | सिडको एन-१ मधील बंगल्यातून रिव्हॉल्व्हर आणि चांदीचे दागिने पळविणारे दोन चोरटे अटकेत

सिडको एन-१ मधील बंगल्यातून रिव्हॉल्व्हर आणि चांदीचे दागिने पळविणारे दोन चोरटे अटकेत

googlenewsNext
ठळक मुद्दे गुन्हेशाखेची कामगिरी: रिव्हॉल्व्हरसह चांदीची भांडी चोरट्यांकडून जप्त, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते चोरटे


औरंगाबाद : सिडको एन-१ येथील आरटीओ अधिकाºयाचा बंद बंगला फोडून परवानाधारक पिस्तुलासह सुमारे एक लाख रुपये किमतीची चांदीची भांडी चोरून नेणाºया दोन चोरट्यांना गुन्हेशाखेने अटक केली. चोरून नेलेला किमती माल पोलिसांनी जप्त केल्याची माहिती, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत दिली.
संतोष ऊर्फ मुकेश ऊर्फ बांग्या गणेश रामफळे (रा. शहानगर, चिकलठाणा) आणि प्रशांत कचरू ठोंबरे (२६,राधास्वामी कॉलनी, हर्सूल) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आरोपींचा तिसरा साथीदार आकाश गावडा (रा. कासंबरी दर्गा परिसर पडेगाव) हा पसार झाला आहे. पोलीस आयुक्त म्हणाले की, सिडको एन-१ येथील निवृत्त अधिकारी आर. टी. देशमुख हे ठाण्यात मुलाकडे राहण्यासाठी गेले आहेत. यामुळे सहा-सात महिन्यांपासून त्यांच्या बंगल्याला कुलूप होते. २ एप्रिल रोजी चोरट्यांनी बंगल्याची मागील खिडकी तोडून चोरी केली होती. या घटनेत सुमारे पावणेदोन लाख रुपये किमतीची चांदीची भांडी ,सोन्याची अंगठी आणि परवाना असलेले रिव्हॉल्व्हर चोरीला गेले होते. याप्रकरणी ६ एप्रिल रोजी एमआयडीसी सिडको ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंद झाला होता. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखेचे उपनिरीक्षक नंदकुमार भंडारे, कर्मचारी संतोष सोनवणे, बापूराव बावस्कर, लाला पठाण, नंदलाल चव्हाण, योगेश गुप्ता आणि रितेश जाधव हे तपास करीत होते. तपासादरम्यान परिसरातील सीसीटीव्ही कॅमेºयात पोलिसांच्या रेकॉर्डवरील आरोपी सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाले होते. मात्र, हे आरोपी पोलिसांना सापडत नव्हते. दरम्यान १३ रोजी दुपारी पोलिसांचे पथक गस्तीवर असताना जटवाडा रस्त्यावरील एकतानगर येथे चांदीची भांडी विक्री करण्यासाठी दुचाकीने दोघे जण येणार असल्याची माहिती खबºयाने पोलिसांना दिली. पोलिसांनी तेथे सापळा रचला असता प्लास्टिक गोणी हातात घेऊन जाताना दोन जण त्यांना दिसले. संशयावरून पोलिसांनी त्यांना पकडले आणि त्यांच्याकडील गोणीची झडती घेतली असता त्यात चांदीच्या वस्तू आढळल्या. त्यांना गुन्हेशाखेत आणून त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी सिडको एन-१ येथील घरफोडीतील हा माल असल्याची कबुली दिली. या चोरीच्या घटनेतील लपवून ठेवलेले रिव्हॉल्व्हरही त्यांनी पोलिसांना काढून दिले.
तीन गुन्ह्याची कबुली
शहरातील बेगमपुरा हद्दीत आणि पुष्पनगरी भागात चार ते सहा महिन्यांपूर्वी घरफोड्या केल्याची कबुली आरोपींनी दिली. त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांनी व्यक्त केली.

Web Title: Two cops fleeing revolvers and silver jewelery in CIDCO N-1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.