ट्रकचालकाने पळविले ६३ लाखांचे विदेशी मद्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 12:16 AM2018-01-21T00:16:53+5:302018-01-21T00:16:59+5:30

पनवेल येथे पाठविण्यात आलेला ६३ लाख ३० हजार ३०८ रुपयांचा विदेशी मद्याचा साठा ट्रकचालकाने पसार केला. चिकलठाणा एमआयडीसीमधील मद्यनिर्मिती करणाºया कंपनीतून २२ डिसेंबर रोजी मद्य घेऊन ट्रक मुंबईला जात असताना ही घटना घडली.

Truck driver escaped with foreign liquor of Rs 63 lakh | ट्रकचालकाने पळविले ६३ लाखांचे विदेशी मद्य

ट्रकचालकाने पळविले ६३ लाखांचे विदेशी मद्य

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : पनवेल येथे पाठविण्यात आलेला ६३ लाख ३० हजार ३०८ रुपयांचा विदेशी मद्याचा साठा ट्रकचालकाने पसार केला. चिकलठाणा एमआयडीसीमधील मद्यनिर्मिती करणाºया कंपनीतून २२ डिसेंबर रोजी मद्य घेऊन ट्रक मुंबईला जात असताना ही घटना घडली.
तक्रारदार संजय अग्रवाल हे चिकलठाणा येथील युनायटेड स्पिरिट या कंपनीचे अधिकारी आहेत. कंपनीला पनवेल येथील एका डीलरकडे विदेशी मद्य पाठविण्याची आॅर्डर आली होती. त्यानुसार त्यांनी अधिकृत ट्रान्स्पोर्टकडून एक ट्रक मागविला. उत्पादन शुल्क विभागाकडून मद्य वाहतूक करण्यासाठी त्यांनी अधिकृत परवाना घेतला. २२ डिसेंबर रोजी रात्री आरोपी ट्रकचालक शेख वशीम शेख रहीम (रा.सिन्नर रोड, नाशिक) याने कंपनीतून सुमारे ६३ लाख ३० हजार ३०८ रुपये किमतीचे विदेशी मद्याचे ९१५ बॉक्स ट्रकमध्ये भरले आणि तो ट्रक घेऊन मुंबईकडे निघाला. दुसºया दिवशी सकाळी तो पनवेलला न जाता रस्त्यातच कोठेतरी गायब झाला आणि त्याने मद्यसाठ्याची परस्पर विल्हेवाट लावली. ही बाब तक्रारदार यांना समजताच त्यांनी संबंधित ट्रकचालक आणि ट्रान्स्पोर्ट एजन्सीकडे याविषयी तक्रार नोंदवून चौकशी केली असता घटनेपासून ट्रकचालक पसार असल्याचे समोर आले. पोलीस उपनिरीक्षक सुभाष चव्हाण तपास करीत आहेत.

Web Title: Truck driver escaped with foreign liquor of Rs 63 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.