कचराकोंडी फुटणार पुढच्या वर्षी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 12:30 AM2018-06-12T00:30:01+5:302018-06-12T00:31:27+5:30

शहरातील कचराप्रश्नी महापालिकेने कालबद्ध कार्यक्रम राबविण्यासाठी सुरुवात केली आहे. शहरातील कचऱ्यावर शंभर टक्के प्रक्रिया करण्यासाठी आणखी सहा महिने लागणार असल्याची कबुली सोमवारी महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक, महापौर नंदकुमार घोडेले यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.

The trash can explode next year | कचराकोंडी फुटणार पुढच्या वर्षी

कचराकोंडी फुटणार पुढच्या वर्षी

googlenewsNext
ठळक मुद्देऔरंगाबाद मनपा आयुक्त : कालबद्ध कार्यक्रम राबविण्यास वेळ लागणार

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शहरातील कचराप्रश्नी महापालिकेने कालबद्ध कार्यक्रम राबविण्यासाठी सुरुवात केली आहे. शहरातील कचऱ्यावर शंभर टक्के प्रक्रिया करण्यासाठी आणखी सहा महिने लागणार असल्याची कबुली सोमवारी महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक, महापौर नंदकुमार घोडेले यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली. न्यायालयाला दिलेल्या शपथपत्रानुसार मागील ९० दिवसांमध्ये महापालिकेला काहीच काम करता आले नाही. याबद्दल पुन्हा एकदा न्यायालयाची दिलगिरी व्यक्त करण्यात येणार असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
शहरातील कचरा उचलणे आणि त्यावर प्रक्रिया करण्यासाठी एकच निविदा काढण्यात येत आहे. कचरा उचलणे म्हणजे चौकाचौकातील कचरा उचलणे नव्हे, तर डोअर टू डोअर कलेक्शनची जबाबदारी कंत्राटदारावर राहणार आहे. या कामासाठी त्याने सुचविलेल्या दरानुसार पैसे देण्यात येतील. कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी कंत्राटदाराला कोणत्या मशीन हव्यात त्या महापालिका खरेदी करून देईल. कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी मनपा एक रुपयाही देणार नाही. दीडशे मेट्रिक टनचे तीन प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. सध्या महापालिका खाजगी रिक्षा, चालक, डिझेल आदींसाठी २० ते २५ कोटी रुपये खर्च करीत आहे. यातील एक टप्पाही विस्कळीत झाल्यास शहरात कचºयाची ओरड होते. या सर्व बाबींचा अत्यंत बारकाईने अभ्यास करून ठोस निर्णय घेण्यात आले आहेत. डिसेंबरअखेरपर्यंत शंभर टक्के प्रक्रिया होईल.
शहरात ठिकठिकाणी कचºयावर प्रक्रिया करण्यासाठीही प्रयत्न केले जातील. सध्या शहरातील प्रमुख रस्त्यांवर पडून असलेल्या कचºयाचे वर्गीकरण करून तो उचलण्यात येईल. यासाठी किमान आठ दिवसांचा वेळ लागेल.
या कामासाठी कचरा वेचकांची मदत घेतली जाईल. नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे कामही सुरू करण्यात येणार आहे. प्रत्येक वॉर्डातील कचरा तेथेच जिरावा यादृष्टीनेही प्रयत्न होतील. शासनाने सुचविलेल्या डीपीआरमध्ये काही बदल करायचे असतील तर ते शासनाला सांगून बदल केले जातील.
नागरिकांनी विश्वास का ठेवावा?
मागील तीन महिन्यांपासून महापालिका प्रशासन आणि पदाधिकारी कचरा प्रश्नात निव्वळ घोषणा करीत आहेत. आता तरी नागरिकांनी मनपावर का विश्वास ठेवावा, या प्रश्नावर महापौर, आयुक्त यांनी नमूद केले की, न्यायालयाला दिलेल्या शपथपत्रानुसारच काम होत आहे. या कामात विलंब झाला, हे आम्हाला मान्य आहे. रमजाननिमित्त बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होत आहे. व्यापाºयांना नोटिसा देण्याचे आदेशही महापौरांनी दिले.

Web Title: The trash can explode next year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.