भावी शिक्षकाकडून बारावीच्या विद्यार्थिनीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2019 12:10 AM2019-02-17T00:10:03+5:302019-02-17T00:10:20+5:30

वैजापूर तालुक्यातील घटना : अश्लील छायाचित्र व्हायरल करण्याची धमकी

 Torture on the Xavid Vidyarthi from a future teacher | भावी शिक्षकाकडून बारावीच्या विद्यार्थिनीवर अत्याचार

भावी शिक्षकाकडून बारावीच्या विद्यार्थिनीवर अत्याचार

googlenewsNext

वैजापूर : अश्लील छायाचित्र व्हॉटस्अ‍ॅपवरून व्हायरल करण्याची धमकी देत एका अल्पवयीन तरुणीवर भावी शिक्षकाने बलात्कार केल्याची घटना वैजापूर तालुक्यातील नालेगाव येथे घडली. याप्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपीस शनिवारी अटक करण्यात आली आहे.
परसराम मन्साराम बिघोत असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, पीडित तरुणी ही संजरपूरवाडी (ता.वैजापूर) येथील रहिवासी असून, ती एका महाविद्यालयात बारावीचे शिक्षण घेत आहे. बिघोतची सदर तरुणीसोबत ओळख झाल्यानंतर तो तिची छेडछाड करत होता. तरुणीने याबाबत घरी सांगण्याची धमकी देऊन विरोध केल्यावरसुद्धा त्याने माझ्यासोबत फोटो काढ नाही तर तुझे आई-वडील व भावाचा काटा काढेन, अशी धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या पीडित तरुणीने फोटो काढले. मात्र, त्यानंतर हे फोटो व्हॉटस्अ‍ॅपवर व्हायरल करण्याची धमकी देत त्याने ८ फेब्रुवारी रोजी तरुणी महाविद्यालयात आली असताना तिला धमकावत नालेगाव येथील मित्राच्या घरी नेऊन बळजबरीने अत्याचार केला, अशी तक्रार पीडित तरुणीने शनिवारी दिली आहे.
यावरून वैजापूर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली. पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेऊन न्यायालयासमोर हजर केले असता आरोपीस १८ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी पुढील अधिक पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. भगवान डांगे करत आहेत.

चौकट...
आरोपी बदनापुरात घेत आहे बीपीएडचे शिक्षण
आरोपी शिक्षक परसराम बिघोत हा जालना जिल्ह्यातील बदनापूर येथे बीपीएडचे शिक्षण घेत असून, त्याची राज्य स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू म्हणून ओळख आहे. विशेष म्हणजे गुन्हा दाखल होताच आरोपीला पकडण्यासाठी सपोनि. भगवान डांगे, पोना. मोईज बेग, पोकॉ. विठ्ठल जाधव हे संजरपूरवाडी व नालेगाव येथे गेले होते. मात्र, आरोपी अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी वैजापूर येथे आल्याचे कळताच पोलिसांनी शहरात दोन तास तपास करून त्याला अटक केली.

Web Title:  Torture on the Xavid Vidyarthi from a future teacher

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस