राज्य कर्करोग रूग्णालयातील भाभा ट्रॉन व लिनर एक्सलेटरमुळे रुग्णांची वेटींग होणार कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2017 11:20 AM2017-11-18T11:20:05+5:302017-11-18T11:31:01+5:30

किरणोपचारासाठी उपयुक्त २५ कोटींच्या लिनर एक्सलेटर यंत्र आणि बंकरला प्रशासकीय मंजूरी मिळाली आहे़. या दोन्हीमुळे किरणोपचाराची वेटिंग कमी होण्यास मोठी मदत होईल.

State Cancer Hospital's Bhabha Tron and Liner Accelerator will reduce the patient's waiting | राज्य कर्करोग रूग्णालयातील भाभा ट्रॉन व लिनर एक्सलेटरमुळे रुग्णांची वेटींग होणार कमी

राज्य कर्करोग रूग्णालयातील भाभा ट्रॉन व लिनर एक्सलेटरमुळे रुग्णांची वेटींग होणार कमी

googlenewsNext
ठळक मुद्दे भाभा ट्रॉन यंत्रासाठी बंकर उभारणीचे काम प्रगथीपथावर असून डिसेंबरअखेर हे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे़. याचबरोबर किरणोपचारासाठी उपयुक्त लिनर एक्सलेटर यंत्र आणि बंकरला प्रशासकीय मंजूरी मिळाली आहे़.

औरंगाबाद : शासकीय कर्करोग रुग्णालय (राज्य कर्करोग संस्था) परिसरात भाभा ट्रॉन यंत्रासाठी बंकर उभारणीचे काम प्रगथीपथावर असून डिसेंबरअखेर हे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे़. याबरोबरच आता किरणोपचारासाठी उपयुक्त २५ कोटींच्या लिनर एक्सलेटर यंत्र आणि बंकरला प्रशासकीय मंजूरी मिळाली आहे़. या दोन्ही अत्याधुनिक यंत्रामुळे रुग्णालयात किरणोपचारासाठी येणा-या रुग्णांची  वेटिंग कमी होण्यास मोठी मदत होईल.

किरणोपचाराच्या रुग्णांचे वेटिंग कमी होण्याच्या दृष्टीने हॉस्पिटलला ‘भाभा ट्रॉन’ हे खास भारतीय बनावटीचे रेडिएशन मशीनही प्राप्त झाले आहे. यासाठी रुग्णलयाच्या परिसरात बंकर उभारण्यात येत आहे. याचे काम ७० टक्के पूर्ण झाले आहे. बंकरचे काम पूर्ण होताच ‘भाभा ट्रॉन’ रुग्णसेवेत दाखल होईल.

रूग्णालयात किरणोपचारासाठी सध्या अडीच  महिन्यांची वेटींग करावी लागत आहे़. ही वेटींग कमी करण्यासाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहे़.  गेल्या पाच वर्षामध्ये हजारो रूग्णांना येथील उपचारामुळे नवसंजीवनी मिळाली़. नव्या यंत्रामुळे किरणोपचारासाठी मोठा हातभार लागणार आहे.

रूग्णांना फायदा 
कर्करोग रूग्णालयात नेहमीच रूग्णांची गर्दी असते़. रेडिओ थेरपीसाठी रूग्णांना वेटींग करावी लागते. सध्या भाभा ट्रॉनसाठी बंकर उभारणीचे काम सुरू आहे़. राज्य कर्करोग संस्थेचा दर्जा मिळाल्यानंतर ९८ कोटी मंजूर झालेत. त्यातील ४३ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे़. आता २५ कोटींच्या लिनर एक्सलेटर आणि बंकरला प्रशासकीय  मंजूरी मिळाल्याने रूग्णांचा याचा फायदा होणार आहे़. असे कर्करोग रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड म्हणाले.

Web Title: State Cancer Hospital's Bhabha Tron and Liner Accelerator will reduce the patient's waiting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.