आजपासून रमजान; उद्या पहिला उपवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 01:24 AM2018-05-16T01:24:13+5:302018-05-16T01:24:57+5:30

मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्याला बुधवारपासून सुरुवात होत आहे. गुरुवारी पहिला उपवास ठेवण्यात येणार आहे.

Ramzan from today; Tomorrow is the first fast | आजपासून रमजान; उद्या पहिला उपवास

आजपासून रमजान; उद्या पहिला उपवास

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्याला बुधवारपासून सुरुवात होत आहे. गुरुवारी पहिला उपवास ठेवण्यात येणार आहे. बुधवारी रात्रीपासून तरावीहची नमाज पढण्यास सुरुवात होईल. यंदा कडक उन्हाळ्यात उपवासाला सुरुवात होत असल्याने भाविकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
मे हिटमुळे अगोदरच अंगाची लाहीलाही होत आहे. त्यातच रमजान महिन्यात उपवास ठेवायचे म्हणजे भाविकांसाठी परीक्षाच ठरणार आहे.
यंदा १७ मेपासून रमजानच्या महिन्यास सुरुवात होत आहे.
शहरातील ऐतिहासिक शाही मशीद येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही जय्यत तयारी करण्यात आली आहे. हाफेज मोहमद जुबैैर, हाफेज मोहमद सलीम, हाफेज मोहमद अनीस दररोज तीन ‘पारे’पढणार आहेत. रात्री ८.४५ वाजता ईशांची नमाज सुरू होणार असल्याचे संयोजकांनी कळविले आहे. ईदगाह रोजेबाग येथे अवलिया मशीद येथे तीन पारे तरावीहची नमाज पढण्यात येईल. रात्री ८.४५ वाजता ईशांची नमाज सुरू होणार असून भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. दरवर्षीप्रमाणे शहागंज मशिदीमध्येही ‘कुराण’ पढण्यात येणार आहे.

Web Title: Ramzan from today; Tomorrow is the first fast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.