ऐन दिवाळीत प्रवाशांची कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 01:30 AM2017-10-17T01:30:08+5:302017-10-17T01:30:08+5:30

विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचा-यांनी ऐन दिवाळीत बेमुदत संपाचे हत्यार उपसल्याने लाईफलाईन असलेल्या एसटी प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर कोंडी होणार आहे.

Passanger's inconvienience due to strike | ऐन दिवाळीत प्रवाशांची कोंडी

ऐन दिवाळीत प्रवाशांची कोंडी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचा-यांनी ऐन दिवाळीत बेमुदत संपाचे हत्यार उपसल्याने लाईफलाईन असलेल्या एसटी प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर कोंडी होणार आहे. संपाच्या पार्श्वभूमीवर बीड विभागातील आठ आगारातून पुरेसे नियोजन केले असून, संपात सहभागी नसलेल्या कर्मचा-यांची मदत घेतली जाणार असल्याचे विभाग नियंत्रकांनी सांगितले. हा बेमुदत संप प्रशासनाने कितीही हाणून पाडला तरीही १०० टक्के यशस्वी होणार असल्याचा दावा एस. टी. कामगार संघटनेचे विभागीय सचिव अशोक गावडे यांनी केला आहे.
दिवाळीनिमित्त घरी येण्यासाठी बाहेरगावच्या नागरिकांना एस. टी. बसचा आधार घ्यावा लागतो. मात्र, सण सुरु होताच एस. टी. कर्मचा-यांनी संप पुकारल्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची कोंडी होणार आहे. संपाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने पुरेसे नियोजन केले असून, संपात सहभागी नसलेल्या संघटनेच्या कर्मचा-यांच्या मदतीने बसेस सोडण्यात येणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार ७० टक्के कर्मचारी संपावर जाणार असल्यामुळे एस. टी.चे नियोजन कोलमडणार असून, प्रवाशांना भुर्दंड बसणार आहे.
दरम्यान, प्रवाशांची अडचण होणार नाही यासाठी विभागनिहाय नियोजन करण्यात आले असून, जिल्ह्यातील प्रत्येक आगारासाठी एक पालक अधिकारी नियुक्त करण्यात आला आहे. आगार प्रमुख आणि पालक अधिकारी यांच्या समन्वयाने व्यवस्थापन सुरळीत करण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. संपाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन आवश्यक असेल तेथील बस फेºयांमध्ये वाढ केली जाणार असून, उपलब्ध कर्मचारी संख्येनुसार बसेस पाठविण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.
सोमवारी दिवसभर संपाबाबत काय निर्णय होतो याकडे एसटी कर्मचा-यांचे लक्ष लागले होते. या संपाला ईपीएस ९५ निवृत्त कर्मचारी संघटनेने पाठिंबा दिला असून, यावेळी झालेल्या बैठकीत जिल्हाध्यक्ष सय्यद हमीद, सूर्यभान नवले, महारुद्र मोराळे, डॉ. संजय तांदळे, अरुण खोडसकर उपस्थित होते.
दरम्यान, संपाच्या पार्श्वभूमीवर खाजगी प्रवासी वाहतूक करणा-यांकडून अवाजवी भाडे आकारुन लूट सुरु केली आहे. पुण्यासाठी हजार, तर मुंबईसाठी दीड हजार रुपये भाडे आकारले जात आहे. संप सुरु राहिल्यास त्याचा फटका मात्र प्रवासी जनतेला बसणार आहे.

Web Title: Passanger's inconvienience due to strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.