आता बोला, कंत्राटी भरती प्रक्रियेतही घोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 09:55 PM2018-10-20T21:55:52+5:302018-10-20T21:57:39+5:30

घाटी रुग्णालयातील महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था कार्यालयांतर्गतच्या रिक्त कंत्राटी पदांच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याचे समोर आले. त्यामुळे ४ कंत्राटी पदांची भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली.

 Now, talk about the process of recruitment | आता बोला, कंत्राटी भरती प्रक्रियेतही घोळ

आता बोला, कंत्राटी भरती प्रक्रियेतही घोळ

googlenewsNext
ठळक मुद्दे घाटी रुग्णालय : जानेवारीत झालेली ४ कंत्राटी पदांची भरती प्रक्रिया रद्द


औरंगाबाद : घाटी रुग्णालयातील महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था कार्यालयांतर्गतच्या रिक्त कंत्राटी पदांच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याचे समोर आले. त्यामुळे ४ कंत्राटी पदांची भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था कार्यालयांतर्गत घाटी रुग्णालयाच्या अधिनस्त मंजूर पदांपैकी समुपदेशक, औषधनिर्माता (एआरटी, पैठण), प्रयोगशाळा तंत्रज्ञ, परिचारक (शासकीय वैद्यकीय महाविद्यालय) ही रिक्त चार पदे भरण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार ३० जानेवारी रोजी लेखी परीक्षा आणि ८ फेब्रुवारी रोजी मुलाखती घेऊन भरती प्रक्रि या राबविण्यात आली. परंतु भरती प्रक्रिया मार्गदर्शक सूचनांप्रमाणे झाली नसल्याचे आणि आर्थिक अनियमितता झाल्याचे महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेकडे तक्रार प्राप्त झाली. तक्रारीच्या अनुषंगाने राज्यस्तरीय तीन सदस्यीय चौकशी समितीने ३ व ४ आॅगस्ट रोजी डापकू, जिल्हा सामान्य रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात चौकशी केली. चौकशीअंती समितीने भरती प्रक्रिया मार्गदर्शक सूचनांप्रमाणे झालेली नसल्याचे नमूद केले. त्यामुळे दिलेल्या अहवालाद्वारे ही संपूर्ण ४ कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया रद्द करून निवड होऊन रुजू झालेल्या कर्मचाºयांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. ‘मराएनिसं’चे प्रकल्प संचालक डॉ. अनुपकुमार यादव यांनी अधिष्ठातांना एका पत्राद्वारे ही माहिती दिली आहे.
कारणे दाखवा नोटीस
निवड प्रक्रिया मार्गदर्शक सूचनांप्रमाणे व पारदर्शकपणे पूर्ण केलेली नसल्याने जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापकांना कारणे दाखवा नोटीस बजावून पुढील कारवाई केली जाईल, असेही या पत्रात नमूद केले आहे. अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी यास दुजोरा दिला.

Web Title:  Now, talk about the process of recruitment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.