‘नॅक’ची रंगीत तालीम १३ ते १५ डिसेंबरला होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 11:08 PM2018-12-08T23:08:18+5:302018-12-08T23:09:06+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ‘नॅक’ मूल्यांकन प्रक्रियेने वेग घेतला आहे. ‘नॅक’कडून १० टक्के विद्यार्थ्यांचे मेलद्वारे फिडबॅक सर्वेक्षण झाल्यानंतर आता कोणत्याही वेळी प्रत्यक्ष भेटीच्या तारखा येण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी विद्यापीठ प्रशासनाने १३ ते १५ डिसेंबर रोजी रंगीत तालीम आयोजित केली आहे.

The 'nayak' will be taught from 13 to 15 December | ‘नॅक’ची रंगीत तालीम १३ ते १५ डिसेंबरला होणार

‘नॅक’ची रंगीत तालीम १३ ते १५ डिसेंबरला होणार

googlenewsNext
ठळक मुद्देविद्यापीठ : दोन दिवसांपासून स्वच्छतेला सुरुवात; दहा तज्ज्ञ येणार

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ‘नॅक’ मूल्यांकन प्रक्रियेने वेग घेतला आहे. ‘नॅक’कडून १० टक्के विद्यार्थ्यांचे मेलद्वारे फिडबॅक सर्वेक्षण झाल्यानंतर आता कोणत्याही वेळी प्रत्यक्ष भेटीच्या तारखा येण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी विद्यापीठ प्रशासनाने १३ ते १५ डिसेंबर रोजी रंगीत तालीम आयोजित केली आहे. यात विद्यापीठ, विभागांची तपासणी करण्यासाठी राज्याबाहेरील दहा तज्ज्ञ येणार असल्याची माहिती प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांनी दिली.
विद्यापीठाने नॅकच्या तयारीसाठी मागील काही दिवसांपासून प्रत्येक विभागाची रंगरंगोटीसह डागडुजी सुरू केलेली आहे. ही कामे अंतिम टप्प्यात आलेली असून, काही दिवसांपूर्वी कुलगुरू, प्रकुलगुरूंच्या उपस्थितीत विभागप्रमुखांनी विभागाच्या सद्य:स्थितीचे सादरीकरण केले होते. यात कुलगुरूंना समस्याही सांगितल्या होत्या. या घडामोडीनंतर आता १३ ते १५ डिसेंबर रोजी बाहेरील विद्यापीठांचे दहा तज्ज्ञ विद्यापीठाच्या तपासणीसाठी येणार आहेत. ही रंगीत तालीम असेल. या तज्ज्ञाच्या तीन समित्या केल्या जातील. या समित्या प्रत्येक विभागाला भेटी देऊन पाहणी करतील. तसेच अभ्यास मंडळांचे सदस्य, विभागप्रमुख यांच्याशीही बैठक होणार आहे. विद्यापीठातील विविध संशोधन केंद्रांनाही नॅक समिती भेट देणार असल्याचे डॉ. तेजनकर यांनी सांगितले.
‘नॅक’चा फिडबॅक पूर्ण
‘नॅक’कडे दाखल केलेल्या एसएसआरमधील माहितीच्या आधारे माजी विद्यार्थ्यांकडून ‘नॅक’ फिडबॅक घेते. हा फिडबॅक मेलच्या माध्यमातून घेतला जातो. माजी विद्यार्थ्यांना नॅक मेल पाठविते. त्या मेलमध्ये एक लिंक देण्यात आलेली असते. त्या लिंकवर जाऊन विद्यार्थ्यांना विद्यापीठाविषयीच्या २० प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात. यासाठी एकूण विद्यार्थ्यांपैकी दहा टक्के विद्यार्थ्यांचा फिडबॅक आल्याशिवाय ‘नॅक’ प्रत्यक्ष भेटीसाठी समिती देत नाही. हा फिडबॅक पूर्ण झाल्याचेही डॉ. तेजनकर यांनी स्पष्ट केले.
कुलगुरूंनी घेतली बैठक
नॅकच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे आणि प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांनी शनिवारी विद्यापीठातील प्राध्यापक, विभागप्रमुखांची बैठक घेतली. या बैठकीत विविध विषयांवर, अडचणींवर चर्चा करण्यात आली आहे.

Web Title: The 'nayak' will be taught from 13 to 15 December

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.