नांदेडवर आभाळ फाटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 12:30 AM2017-08-21T00:30:54+5:302017-08-21T00:30:54+5:30

महिन्याभराच्या दीर्घ विश्रांतीमुळे बळीराजाचे तोंडचे पाणी पळाले असताना, गेल्या दोन दिवसांपासून नांदेड जिल्ह्यात रेकॉर्डब्रेक पाऊस झाला़ त्यामुळे नांदेड शहर जलमय झाले होते़ नांदेडसह बारा तालुक्यात अतिवृष्टी झाली असून प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे़

Nanded broke the sky | नांदेडवर आभाळ फाटले

नांदेडवर आभाळ फाटले

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: महिन्याभराच्या दीर्घ विश्रांतीमुळे बळीराजाचे तोंडचे पाणी पळाले असताना, गेल्या दोन दिवसांपासून नांदेड जिल्ह्यात रेकॉर्डब्रेक पाऊस झाला़ त्यामुळे नांदेड शहर जलमय झाले होते़ नांदेडसह बारा तालुक्यात अतिवृष्टी झाली असून प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे़
यंदाच्या पावसाळ्यात नांदेड जिल्ह्यात शुक्रवारपर्यंत सरासरीच्या केवळ ३१९ मि़मी़एवढा पाऊस झाला होता़ त्यात गेल्या महिनाभरापासून उघडीप दिली होती़ मृग नक्षत्र सोडले तर इतर सर्व नक्षत्रांनी निराशाच केली होती़ त्यात हवामान खात्याचे अंदाजही शेतकºयांच्या जखमेवर मीठ चोळण्याचेच काम करीत असल्याच्या प्रतिक्रिया येत होत्या़ माघ नक्षत्रामुळे मात्र सर्वांच्याच आशा पल्लवीत झाल्या आहेत़ शनिवारी सकाळी अकरा वाजेपासून सुरु झालेला पाऊस सलग बरसत होता़ जवळपास ४० तासामध्ये तीन ते चार तासाचा खंड सोडल्यास पावसाची सलग रिपरिप सुरु होती़ शनिवारी रात्री काही वेळासाठी उघडीप दिलेल्या पावसाने रविवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास वीजेच्या कडकडाटासह जोरदार हजेरी लावली़ अवघ्या तीन ते चार तासात नांदेडात धो-धो पाऊस बरसला़ त्यामुळे अनेक भागांचा वीजपुरवठा खंडित झाला होता़ पहाटेच्या अंधारातच अनेकांना घरात पाणी शिरल्यामुळे जाग आली़
दत्तनगर, आनंदनगर, बाबानगर, भाग्यनगर, उदयनगर, हमालपुरा, शिवाजीनगर, गोकुळनगर, स्रेहनगर पोलिस वसाहत, विष्णूनगर, श्रीनगर, भाग्यनगर, मोर चौक, भावसार चौक, अण्णा भाऊ साठे चौक, महावीर चौक, वजिराबाद आदी भागांमध्ये गुडघाभर तर कुठे कंबरेपर्यंत पाणी साचले होते़ दत्तनगर, आनंदनगर, बाबानगर, शाहू नगर, गोकुळनगर, हमालपुरा आदी भागात जवळपास ३०० हून अधिक घरात पाणी शिरले होते़ त्यामुळे दिवसभर या घरात चूल पेटली नाही़ नागरीकांना घरातील पाणी काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागली़ अनेकांनी चिमुकल्यांसह मोजके सामान घेवून नातेवाईकांच्या घरी आश्रय घेतला होता़
दुपारी बारा वाजेपर्यंत शहरातील मुख्य रस्त्यावरील वाहतुकही ठप्प झाली होती़ पाण्यामुळे अनेक दुचाकी, चारचाकी मध्येच बंद पडत होत्या़ रविवारी पहाटेपासून सुरु असलेल्या पावसाने दुपारी तीन वाजेच्या सुमारास तासाभरासाठी विश्रांती घेतली होती़ त्यानंतर पुन्हा भुरभूर सुरु झाली़ रात्री उशिरापर्यंत शहरात रिमझिम पाऊस सुरुच होता़ शहरानजीक वाहणाºया आसना नदीचे पात्रही दुथडी भरुन वाहत होते़ लहान-मोठ्या नाल्यांनाही पूर आला होता़

Web Title: Nanded broke the sky

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.