Namantar Andolan : नामांतर लढ्यात ‘लोकमत’चा बहुमोल वाटा : रतन पंडागळे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 01:49 PM2019-01-12T13:49:06+5:302019-01-12T13:50:18+5:30

लढा नामविस्ताराचा : विद्यापीठ नामांतर लढा आणि ‘लोकमत’ हे जणू त्याकाळी समीकरणच बनले होते. ‘लोकमत’ने अत्यंत जाणीवपूर्वक नामांतराची भूमिका घेतली. या लढ्यात ‘लोकमत’चा वाटा बहुमोल राहिला, याबद्दल दुमत नाहीच. ‘लोकमत’च्या खंबीर पाठिंब्यामुळेच हा लढा यशस्वीपणे लढता आला, असे उद्गार या लढ्यातील एक सेनानी रतनकुमार पंडागळे यांनी काढले. 

Namantar Andolan: 'Lokmat' is a valuable contribution in the Namantar Andolan: Ratan Pandagale | Namantar Andolan : नामांतर लढ्यात ‘लोकमत’चा बहुमोल वाटा : रतन पंडागळे 

Namantar Andolan : नामांतर लढ्यात ‘लोकमत’चा बहुमोल वाटा : रतन पंडागळे 

googlenewsNext

- स. सो. खंडागळे 

बघता-बघता या नामांतराला २५ वर्षे झाली; पण नव्या पिढीला नामांतराचा जाज्वल्य इतिहास कळावा म्हणून माझे प्रयत्न सुरू असतात. त्याचाच एक भाग म्हणून १७ सप्टेंबर २००६ रोजी ‘नामांतर पर्व’ हा ग्रंथ  प्रकाशित केला, तसेच ‘लढा नामांतराचा’ हा चित्रपटही प्रदर्शित केला, असे त्यांनी सांगितले. 

विद्यापीठ नामांतर रौप्य महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ते ‘लोकमत’शी बोलत होते. दरवर्षी नामांतरदिनी जयभीमनगर चौकात या लढ्यातील दलितेतर नामांतरवाद्यांच्या योगदानाबद्दल सन्मान सोहळा आयोजित करण्यात येत असतो. यावर्षी हा सोहळा १४ जानेवारी रोजी सकाळी ११ वा. होईल. त्यात बॅ. जवाहर गांधी, प्राचार्य राजाराम राठोड, प्रा. श्रीराम जाधव व माजी उपमहापौर तकी हसन यांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर धर्मनिरपेक्ष जयंती उत्सव महासंघातर्फे स्मृतिचिन्ह देऊन व निळा फेटा बांधून सन्मान करण्यात येणार असल्याची माहितीही पंडागळे यांनी दिली. त्यांनी सांगितले की, नामांतर लढ्यातील शहीद पोचिराम कांबळे यांच्या पत्नी व सुनेने गतवर्षी बौद्ध धम्माचा स्वीकार केला. त्यांचा सत्कार करून त्यांना अर्थसाहाय्यही दिले होते.

त्यांनी सांगितले की, आम्ही सारे त्यावेळी दलित पँथरच्या वतीने या लढाईत सहभागी झालेलो होतो. जयभीमनगर तर नामांतर लढ्याचे केंद्र बनले होते, तसेही ते पूर्वीपासून आंबेडकरी चळवळीचे केंद्र आहेच, असे सांगत पंडागळे हे नामांतर लढ्यातील ‘लोकमत’च्या बहुमोल सहकार्याकडे पुन्हा वळले. यासंदर्भातील ‘लोकमत’ची सामाजिक बांधिलकी वाखाणण्यासारखी राहिली. एकीकडे काही वर्तमानपत्रे आगीत तेल ओतून नामांतराच्या प्रश्नावरून समाजा-समाजांत उभी दरी निर्माण करण्यात पुरुषार्थ मानत होती, तर त्याचवेळी  दिवंगत आदरणीय जवाहरलालजी दर्डा, तसेच विजय दर्डा आणि राजेंद्र दर्डा यांच्या खंबीर भूमिकेमुळे ‘लोकमत’च जणू  ‘नामांतर योद्धा’ बनून लढत राहिला.

तत्कालीन कार्यकारी संपादक दिवंगत म.य. ऊर्फ बाबा दळवी यांच्या वेळोवेळच्या अग्रलेखांनी हा लढा दिवसेंदिवस वैचारिक बनत गेला. ‘लोकमत’चीही कर्तबगारी नामांतर व आंबेडकरी चळवळ कधीच विसरू शकणार नाही. भीमसैनिक भीमऊर्जेने  पेटून उठले होते.  औरंगाबादेत व मुंबईत कितीतरी वेळा मोर्चे काढले गेले, सत्याग्रह केला गेला. कारावास झाला. या सगळ्या प्रक्रियेमध्ये मला व माझ्या सहकाऱ्यांना सहभागी होता आले. बाबासाहेबांच्या नावासाठी एवढा प्रदीर्घ संघर्ष करावा लागायला नको होता; पण तो करावा लागला, एवढे मात्र खरे!

Web Title: Namantar Andolan: 'Lokmat' is a valuable contribution in the Namantar Andolan: Ratan Pandagale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.