एमजीएम, कन्नड संघ विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 12:28 AM2017-11-25T00:28:05+5:302017-11-25T00:28:25+5:30

एमजीएम स्पोटर््स क्लब मैदानावर आजपासून सुरू झालेल्या टष्ट्वेंटी-२० क्रिकेट स्पर्धेत यजमान एमजीएम आणि सुपरकिंग संघांनी प्रतिस्पर्धी संघांवर मात केली. संग्राम गट्टे आणि सलमान अहमद हे सामनावीर किताबाचे मानकरी ठरले.

MGM, Kannada team wins | एमजीएम, कन्नड संघ विजयी

एमजीएम, कन्नड संघ विजयी

googlenewsNext

औरंगाबाद : एमजीएम स्पोटर््स क्लब मैदानावर आजपासून सुरू झालेल्या टष्ट्वेंटी-२० क्रिकेट स्पर्धेत यजमान एमजीएम आणि सुपरकिंग संघांनी प्रतिस्पर्धी संघांवर मात केली. संग्राम गट्टे आणि सलमान अहमद हे सामनावीर किताबाचे मानकरी ठरले.
एमजीएम संघाने लिप फास्टनर संघाविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ७ बाद १७६ धावा फटकावल्या. त्यांच्याकडून गिरीश गाडेकरने १ षटकार, ४ चौकारांसह ३३, मयूर जंगलेने ३ चौकार, एका षटकारासह ३६, शेखर ताठेने २४ धावा केल्या. अंकुश बोधगिरे व सम्राट गुट्टे यांनी अनुक्रमे २१ व २५ धावा केलया. लिप फास्टनरकडून राजू मदन, विक्रम चौधरी, सचिन पायार, राहुल पाटील व अमोल हाके याने प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात लिप फास्टनर संघ ८ बाद १७२ पर्यंत मजल मारू शकला. त्यांच्याकडून राहुल पाटीलने ६ चौकारांसह ४९, इंद्रजित उढाणने ६ चौकारांसह ४१ धावा केल्या. राजू मदन व सचिन पिसे यांनी अनुक्रमे १९ व १६ धावा केल्या. एमजीएम संघाकडून संग्राम गुट्टेने १२ धावांत ३ गडी बाद केले. सागर शेवाळे व अंकित चोकर यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
दुपारच्या लढतीत कन्नड सुपरकिंग संघाने प्रथम फलंदाजी करणाºया फ्रेण्डस् क्लबला १०६ धावांत रोखले. फ्रेण्डस् क्लबकडून अमर यादवने ४ चौकार, ३ षटकारांसह ५९ धावा केल्या. कन्नड सुपरकिंग्जकडून आनंद ठेंगे, शशिकांत कदम व हरमितसिंग यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात कन्नडने विजयी लक्ष्य ५.४ षटकांत ७ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. त्यांच्याकडून सलमान अहमदने ७ चौकार व एका षटकारासह ४५ धावा केल्या. शशिकांत कदमने १९ व मझर पठाणने १७ धावा केल्या. फ्रेण्डस् क्लबकडून गौरव शिंदेने ३, तर ऋषिकेश नायरने २ गडी बाद केले. तत्पूर्वी, स्पर्धेचे उद्घाटन एम.एस.ई.बी.चे सहव्यवस्थापक ओम प्रकाश बकोरिया, जिल्हा क्रिकेट संघटनेचे सहसचिव शिरीष बोराळकर, एमजीएमचे सचिव अंकुशराव कदम, डॉ. प्रवीण सूर्यवंशी, डॉ. आशिष गाडेकर यांच्या उपस्थितीत झाले. या प्रसंगी मनीष पोलकम, जॉय थॉमस, कर्मवीर लव्हेरा, नीलेश हारदे, उदय बक्षी, गंगाधर शेवाळे, विष्णू बब्बीरवाल, जगदीश पटेल, दिनेश वंजारे, संग्राम देशमुख, शरद पवार आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन अमृत बिºहाडे यांनी केले.

Web Title: MGM, Kannada team wins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.