‘स्वातंत्र्य संग्राम’ स्मारकाचे पावित्र्य कायम ठेवा, मराठवाडा मुक्तिसंग्राम पाठ्यपुस्तकात यावा - राज्यपाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2017 01:36 AM2017-11-05T01:36:51+5:302017-11-05T01:38:48+5:30

मराठवाडा- हैदराबाद मुक्तिसंग्रामाची साक्ष देणारे क्रांतीचौक हे स्थळ आता स्वातंत्र्यसंग्राम स्मारकातील २०० फूट ध्वजस्तंभामुळे विश्वपटलावर ओळख निर्माण करण्यासाठी निघाले आहे. देशभक्ती, स्वाभिमान, आत्मविश्वास, आत्मगौरव वाढविणाºया ध्वजस्तंभाची गरिमा (पावित्र्य) कायम ठेवावी, असे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी शनिवारी केले.

Maintain the sanctity of the 'freedom struggle' memorial, Marathwada Mukti Sangram textbook should be available - Governor | ‘स्वातंत्र्य संग्राम’ स्मारकाचे पावित्र्य कायम ठेवा, मराठवाडा मुक्तिसंग्राम पाठ्यपुस्तकात यावा - राज्यपाल

‘स्वातंत्र्य संग्राम’ स्मारकाचे पावित्र्य कायम ठेवा, मराठवाडा मुक्तिसंग्राम पाठ्यपुस्तकात यावा - राज्यपाल

googlenewsNext

औरंगाबाद : मराठवाडा- हैदराबाद मुक्तिसंग्रामाची साक्ष देणारे क्रांतीचौक हे स्थळ आता स्वातंत्र्यसंग्राम स्मारकातील २०० फूट ध्वजस्तंभामुळे विश्वपटलावर ओळख निर्माण करण्यासाठी निघाले आहे. देशभक्ती, स्वाभिमान, आत्मविश्वास, आत्मगौरव वाढविणाºया ध्वजस्तंभाची गरिमा (पावित्र्य) कायम ठेवावी, असे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी शनिवारी केले.
क्रांतीचौक येथे अडीच कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या स्वातंत्र्यसंग्राम स्मारकातील ध्वजस्तंभाचे लोकार्पण राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या उपस्थितीत पार पडले.
मराठवाडा- हैदराबाद मुक्तिसंग्राम हा हिंदू, मुस्लीम, शीख, इसार्इंचा स्वातंत्र्यलढा आहे. त्यामुळे या लढ्याची नव्या पिढीला प्रेरणा मिळावी, यासाठी पाठ्यपुस्तकात त्याचा समावेश करावा, अशी अपेक्षादेखील राज्यपालांनी याप्रसंगी व्यक्त केली.
वंदेमातरम म्हणायचे की नाही. राष्ट्रगीतासाठी उभे राहायचे की नाही, यावरून वाद होण्याचे प्रकार दुर्दैवाने आज घडत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, जे इतिहास विसरतात ते इतिहास निर्माण करू शकत नाहीत, असे सांगून राज्यपाल म्हणाले, निजामाला औरंगाबाद ताब्यात घ्यायचे होते; परंतु आपल्या पूर्वजांनी ते होऊ दिले नाही. १९४७ साली देश स्वतंत्र झाला; परंतु आम्ही निजामाच्या गुलामगिरी, अत्याचाराच्या जोखडात होतो. तत्कालीन शासनाने निजामाबरोबर करार केला, राष्ट्रनिर्मिती आणि वेगळे चलन यामुळे निजामाला जोश आला. त्याचे अत्याचार वाढल्यामुळे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पोलीस अ‍ॅक्शनमुळे मराठवाडा-हैदराबाद- कर्नाटक या प्रांतांचे विलीनीकरण भारतात झाले. विलीनीकरण झाले नसते तर आज या प्रांतांची स्थिती दयनीय असती. या प्रांतांविना भारताचा नकाशा अर्धवट राहिला असता.
या स्वातंत्र्यसंग्रामात अनेक मुस्लीमवीरांनी बलिदान दिले आहे. तुरेबाजखान, मौलवी अलाउद्दीन, शोएबउल्ला खान, पवार यांचा उल्लेख करून ते म्हणाले, मुक्तिसंग्रामात ज्या वीरांनी बलिदान दिले, त्यांची स्मारके झाली पाहिजेत. स्वामी रामानंद तीर्थ, भाऊसाहेब वैशंपायन, अनंत भालेराव, विजेंयद्र काबरा, बाबासाहेब परांजपे, चंद्रगुप्त चौधरी, तारामती लड्डा, रमणभाई पारिख, दिगंबरराव बिंदू, देविसिंग चौहान यांच्या योगदानाचे स्मरणही यावेळी त्यांनी केले.
विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, महापौर नंदकुमार घोडेले, जि. प. अध्यक्ष देवयानी डोणगावकर, खा.रावसाहेब दानवे, खा.चंद्रकांत खैरे, आ.अतुल सावे, संजय शिरसाट, इम्तियाज जलील, सतीश चव्हाण, सुभाष झांबड, विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर, आयुक्त डी. एम. मुगळीकर, आयकर विभागाचे प्रधान आयुक्त शिवदयाल श्रीवास्तव, समितीचे सदस्य राम भोगले, मानसिंग पवार यांच्यासह राजकीय, उद्योग, प्रशासकीय अधिकारी व नागरिकांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन मुकुंद कुलकर्णी यांनी केले.

क्रांतिचौकातच ध्वजस्तंभ का उभारला..?
ध्वजस्तंभ उभारण्यासाठी शहरातील चार ते पाच जागांचा विचार करण्यात आला. त्यापैकी बहुतांश जागांचा वाद होता. त्यामुळे क्रांतिचौकातील ही जागा स्तंभासाठी निवडली. शहरात सर्व बाजूंनी हा ध्वज दिसेल, असे समिती सदस्य भोगले यांनी सांगितले. या उद्यानाची दुरवस्था झालेली होती, तसेच गैरवापरही होत असे. त्यामुळे नूतनीकरण करण्याचा निर्णय घेतला, शिवाय लोकसहभागातूनच स्तंभ उभारण्याची संकल्पना पुढे आली. क्रांतिचौकातील ही जागा ऐतिहासिक आहे. राष्ट्रीय उठावापासून मराठवाडा मुक्तिसंग्रामापर्यंत या जागेचे महत्त्व अधोरेखित आहे, असे भोगले यांनी नमूद केले. तत्कालीन विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी या स्तंभ उभारणीसाठी पाठपुरावा केला. त्यांना या कार्यक्रमासाठी विशेष निमंत्रित करण्यात आले होते.

Web Title: Maintain the sanctity of the 'freedom struggle' memorial, Marathwada Mukti Sangram textbook should be available - Governor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.