पक्ष्यांच्या खाद्यासाठी हे 'दाम्पत्य’ महिनाकाठी करते ५० किलो धान्याची खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2019 03:04 PM2019-06-06T15:04:11+5:302019-06-06T15:19:39+5:30

महिन्याकाठी ते पक्ष्यांसाठी २५ किलो बाजरी आणि २५ किलो ज्वारी खरेदी करतात.

this 'couple' purachase 50 kg grains per month for the feed of birds | पक्ष्यांच्या खाद्यासाठी हे 'दाम्पत्य’ महिनाकाठी करते ५० किलो धान्याची खरेदी

पक्ष्यांच्या खाद्यासाठी हे 'दाम्पत्य’ महिनाकाठी करते ५० किलो धान्याची खरेदी

googlenewsNext
ठळक मुद्देप्राणी-पक्ष्यांसाठी केली दाणापाणी आणि निवाऱ्याची सोय! संकटसमयी जखमी झालेले कुत्रे, मांजरींना पुन्हा बरे करून त्यांना जीवदान दिले आहे.

- अबोली कुलकर्णी 

औरंगाबाद : स्वत:साठी प्रत्येकच जण जगतो, आपल्याला दुसऱ्यांसाठी जगता आले पाहिजे, या विचाराला अनुसरून जगणारे फार कमी लोक जगात आहेत. प्राणीमात्रांवर प्रेम करायला शिकविणारे लोकही क्वचितच पाहायला मिळतात. शहरातील ‘गिरी दाम्पत्य’ यांपैकी एक़ गेल्या ७-८ वर्षांपासून ते पक्षी, प्राणी यांच्यासाठी रक्षणकर्ते म्हणून काम करीत आहेत. प्राणी-पक्ष्यांसाठी त्यांनी दाणापाण्याची, निवाऱ्याची सोय केली असून, तसेच संकटसमयी जखमी झालेले कुत्रे, मांजरींना पुन्हा बरे करून त्यांना जीवदान दिले आहे. 

शहराच्या एन-१ परिसरातील भक्तीनगरमध्ये रहिवासी असलेले दाम्पत्य डॉ. प्रल्हाद किशन गिरी आणि स्मिता प्रल्हाद गिरी हे पक्षी-प्राणीप्रेमी म्हणून ओळखले जातात. डॉ. प्रल्हाद गिरी ७ ते ८ वर्षांपासून घराच्या गच्चीवर पक्ष्यांसाठी धान्य आणि पाणी ठेवतात. महिन्याकाठी ते पक्ष्यांसाठी २५ किलो बाजरी आणि २५ किलो ज्वारी खरेदी करतात. घराच्या गच्चीवर त्यांनी या पक्ष्यांना खाद्य म्हणून काही भांड्यांमध्ये पाणी आणि धान्य ठेवतात. पक्षी साधारण दुपारी १२ च्या सुमारास गच्चीवर येऊन मनसोक्त खाद्य 
खातात, पाणी पितात तसेच पाण्यात डुंबून मस्तपैकी आंघोळही करतात. उन्हाच्या तडाख्यापासून वाचण्यासाठी ते कुठे थंडावा मिळेल, याचा शोध घेत घराकडे येतात.

त्यासोबतच त्यांच्या पत्नी स्मिता गिरी या देखील वयाच्या ८ व्या वर्षापासून कुत्री, मांजरं यांच्यासाठी काम करतात. एखादा कु त्रा रस्त्यात जखमी अवस्थेत सापडल्यास त्या ताबडतोब घरी आणून त्याच्यावर उपचार करून त्याला पुन्हा पूर्ववत करतात. कुत्र्यांच्या जाती टिकून राहाव्यात म्हणून त्या प्रयत्नशील आहेत. रस्त्यात सापडलेली अशी अनेक छोटी कु त्र्यांची पिले त्यांनी मोठी करून कॉलनीत दत्तक दिली आहेत. संजय इंगळे यांच्या ‘आला’ या संस्थेसोबत त्या काम करतात. या संस्थेतर्फे ५० कुत्री दत्तक देण्यात आली आहेत. बेवारस कुत्र्यांना रस्त्यात झालेल्या जखमा, अपघातामुळे झालेली हानी दूर करण्यासाठी हे दाम्पत्य सेवा देतात. त्यांच्या या छंदातून ते सर्वांना दुसऱ्यांसाठी जगण्याचा संदेश देतात.

कुत्री दत्तक देण्यासाठी हवे ‘शेल्टर’
गिरी सांगतात,‘आम्ही कित्येक दिवसांपासून मोकाट असलेली कुत्री, त्यांची पिले यांच्यासाठी एका शेल्टरची मागणी महानगरपालिकेक डे केली आहे. मात्र, अद्याप आम्हाला मिळालेले नाही. रस्त्यांवर मोकाट असलेल्या कुत्र्यांना शेल्टरमुळे छत मिळेल, त्याशिवाय कुत्र्यांच्या जाती जपून ठेवता येतील, पिलांना मोठे करून त्यांना योग्य घरी दत्तकही देता येईल.                      

स्मिता गिरी सांगतात,‘सध्या विदेशातील कुत्री, मांजरे हे घरोघरी पाळली जातात. स्वदेशी कुत्री आपल्याला रस्त्यावर फिरताना दिसतात, कुठेतरी रस्त्यातील अपघातात सापडतात. त्यामुळे स्वदेशी कुत्र्यांची जात हळूहळू नेस्तनाबूत होत आहे. शिवाय शिवाय विदेशी कुत्री घरात पाळली की, त्यांचे केस घरात पडतात, त्यामुळे ते आपल्याला हानिकारक ठरते. स्वदेशी कुत्री घराबाहेर राहू शकतात. ते प्रामाणिक आणि माणसांवर प्रेम करणारे असतात.’ 

प्राणी-पक्ष्यांना द्या प्रेमाची वागणूक                                    
प्राणी, पक्षी हे पर्यावरणातील एक घटक आहेत. त्यांच्याशिवाय पर्यावरणाची साखळी पूर्ण होत नाही. त्यांचे प्रमाण कमी झाले तर पर्यावरणाचा समतोल ढासळतो. त्यामुळे देशी कुत्री-मांजरांचे प्रमाण वाढले पाहिजे. ते आपल्याला नि:स्वार्थ प्रेम देतात. त्यांना केवळ माणसांकडून मिळणाऱ्या प्रेमाची अपेक्षा असते. ते देखील तेवढ्याच प्रेमाने आणि प्रामाणिकपणाने तुमच्यासोबत राहतील.

Web Title: this 'couple' purachase 50 kg grains per month for the feed of birds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.