दुचाकी पिकअपची धडक, १ ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 12:12 AM2017-11-23T00:12:37+5:302017-11-23T00:12:46+5:30

भोकरदन-सिल्लोड मार्गावरील मालखेडा पाटीजवळ दुचाकी व पीकअप गाडीची धडक होऊन झालेल्या अपघातात एक तरुण ठार झाला. बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली.

Bike pick-up, 1 killed | दुचाकी पिकअपची धडक, १ ठार

दुचाकी पिकअपची धडक, १ ठार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन : भोकरदन-सिल्लोड मार्गावरील मालखेडा पाटीजवळ दुचाकी व पीकअप गाडीची धडक होऊन झालेल्या अपघातात एक तरुण ठार झाला. बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली.
सोमिनाथ सुरेश जाधव (२२) असे मरण पावलेल्याा तरुणाचे नाव आहे. सोमिनाथ जाधव हा मालखेडा येथून दुचाकीवरून (क्र.एमएच २०, एएम २८९४) जात होता. भोकरदनकडून सिल्लोडकडे जाणाºया पीकअप गाडीने (क्र. एमएच २०,ईजी ०४४२) दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात सोमिनाथ जाधव गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी औरंगाबादला हलविण्यात आले. उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर पीकअप चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. नागरिकांनी त्यास सिल्लोड परिसरात पकडले. या प्रकरणी भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Bike pick-up, 1 killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.