सामान्य प्रसुतीद्वारे जन्मले ४.७५ किलो वजनाचे शिशु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 09:21 PM2018-11-13T21:21:08+5:302018-11-13T21:21:22+5:30

औरंगाबाद : गर्भावस्थेत शिशुचे वजन अधिक असल्यास सामान्य प्रसूती होणे अवघड असते. प्रसूतीदरम्यान शिशुचे खांदे अडकण्याचा धोका असतो. त्यातून माता आणि शिशु या दोघांच्या जीवाला धोका असतो. परंतु शहरातील डॉ. घनश्याम मगर यांनी २८ वर्षीय महिलेच्या ४.७५ कलो वजनाच्या शिशुची सामान्य प्रसूती यशस्वी केली. प्रसुतीनंतर माता आणि बाळाची प्रकृती ठणठणीत असल्याचे त्यांनी सांगितले.

Baby born with normal delivery 4.75 kg | सामान्य प्रसुतीद्वारे जन्मले ४.७५ किलो वजनाचे शिशु

सामान्य प्रसुतीद्वारे जन्मले ४.७५ किलो वजनाचे शिशु

googlenewsNext

जोखमीची प्रसूती यशस्वी : माता आणि बाळाची प्रकृती ठणठणीत
औरंगाबाद : गर्भावस्थेत शिशुचे वजन अधिक असल्यास सामान्य प्रसूती होणे अवघड असते. प्रसूतीदरम्यान शिशुचे खांदे अडकण्याचा धोका असतो. त्यातून माता आणि शिशु या दोघांच्या जीवाला धोका असतो. परंतु शहरातील डॉ. घनश्याम मगर यांनी २८ वर्षीय महिलेच्या ४.७५ कलो वजनाच्या शिशुची सामान्य प्रसूती यशस्वी केली. प्रसुतीनंतर माता आणि बाळाची प्रकृती ठणठणीत असल्याचे त्यांनी सांगितले.

सिंदोन भिंदोन तांडा येथील रहिवासी दिपाली संजय राठोड या डॉ. मगर यांच्याकडे गरोदरपणात उपचारांसाठी आल्या होत्या. तेव्हा गर्भातील शिशुचे वजन ४ किलोपेक्षा अधिक आहे, याचा अंदाज सोनोग्राफीत आला. गरोदरपणात आईच्या रक्तात साखरेचे प्रमाण वाढल्यास बाळाचे वजन वाढत जाते. अशावेळी प्रसूतीदरम्यान अडचणी येतात. बाळाचे खांदे आत अडकल्यास श्वास गुदमरून मृत्युचाही धोका असतो. अशा बाळालाही पहिले ४८ तास निरिक्षणात ठेवणे गरजेचे असते.

बाळाच्या रक्तातील साखर तपासणेही गरजेचे असते. डॉ. मगर म्हणाले,असे बाळ एक टक्क्यांपेक्षा कमी असतात. या आधीचे बाळांतपण नैसर्गिक असल्याने मातेला नैसर्गिक प्रसूतीसाठी प्रोत्साहन दिले. तिचे मनोबल वाढविले. माता आणि तिच्या नातेवाईकांशी चर्चा केल्यानंतर नैसर्गिक प्रसूती करण्याचा निर्णय घेताला. असे बाळांतपण हे आई आणि बाळासाठी अतिजोखमीचे असते. परंतु ही प्रसूती यशस्वी झाली आणि दोघांचीही प्रकृती चांगली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

साधारणपणे ३ किलोपर्यंत वजन
सर्वसाधारणपणे अडीच ते तीन किलोपर्यंत शिशुंचे वजन असते. परंतु मातेला मधूमेह असेल तर शिशुचे वजन अधिक होत असते. अशावेळी सामान्य प्रसूती होणे अवघड असते, असे घाटीतील प्रसूतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. श्रीनिवास गडप्पा म्हणाले.
 
Web Title: Baby born with normal delivery 4.75 kg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.