औरंगाबादमध्ये दोन घरफोड्यांत ३६ तोळे सोने पळविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 12:26 AM2018-07-02T00:26:02+5:302018-07-02T00:27:51+5:30

रेल्वेस्टेशन, हमालवाड्यातील अपार्टमेंटमधील बंद फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील तब्बल २२ तोळ्यांचे दागिने आणि सव्वालाखाची रोकड चोरून नेली. ही खळबळजनक घटना रविवारी (दि.१) सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी सातारा ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया रात्री उशीरापर्यंत सुरू होती.

In Aurangabad, two houses have been destroyed by 36 tola gold | औरंगाबादमध्ये दोन घरफोड्यांत ३६ तोळे सोने पळविले

औरंगाबादमध्ये दोन घरफोड्यांत ३६ तोळे सोने पळविले

googlenewsNext
ठळक मुद्देपोलिसांसमोर चोरट्यांचे आव्हान : गुन्हे शाखेसह सातारा पोलीस घटनास्थळी; फ्लॅटमध्ये वाढली असुरक्षितता

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : रेल्वेस्टेशन, हमालवाड्यातील अपार्टमेंटमधील बंद फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील तब्बल २२ तोळ्यांचे दागिने आणि सव्वालाखाची रोकड चोरून नेली. ही खळबळजनक घटना रविवारी (दि.१) सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी सातारा ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया रात्री उशीरापर्यंत सुरू होती.
रेल्वेस्टेशन परिसरातील अमृतसाई प्लाझा अपार्टमेंटमध्ये दुसऱ्या मजल्यावर प्रशांत बाबासाहेब कोळसे हे पत्नी आणि आठ महिन्याच्या चिमुकल्यासह राहतात. ते संगणक अभियंता असून शासकीय कंत्राटदार असून, त्यांचे कार्यालय याच अपार्टमेंटच्या प्रवेशद्वाराजवळ आहे. त्यांनी म्हाडाकडून घर खरेदी केले असून, त्यासाठी पैशांची जमवाजमव करीत आहेत. त्यांची भेंडा फॅक्टरी (ता. नेवासा) येथे राहणारे त्यांचे आई -वडिल दर्शनासाठी पंढरपूरला जाणार आहेत. यामुळे त्यांनी त्यांच्याकडील दागिने प्रशांतकडे आणून ठेवले होते. कोळसे दाम्पत्य नातेवाईकांना भेटण्यासाठी २९ जून रोजी रात्री भेंडा फॅक्टरी (ता.नेवाासा) येथे गेले होते.
फ्लॅटला कुलूप असल्याची संधी चोरट्यांनी साधली. दरवाजाचे कुलूप चोरट्यांनी लोखंडी टॉमीने तोडले. बेडरूममधील लाकडी अलमारीतील २२ तोळ्यांचे सोन्याचे दागिने, काही चांदीचे दागिने आणि रोख १ लाख २५ हजार रुपये चोरट्यांनी चोरले. अलमारीसोबतच बेडरूममधील
अन्य साहित्य, कपडे अस्ताव्यस्त फेकले.
कोळसे दाम्पत्य रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता घरी पोहोचले तेव्हा चोरी झाल्याचे निदर्शनास आले. सातारा पोलीस आणि गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त रामेश्वर थोरात, पोलीस निरीक्षक प्रेमसागर चंद्रमोरे, पोलीस निरीक्षक मधुकर सावंत, सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे आणि अन्य अधिकारी, कर्मचाºयांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. श्वान पथक, ठसे तज्ज्ञांनाही घटनास्थळी पाचारण करण्यात
आले.
आईने सांभाळण्यासाठी ठेवलेले दागिनेही गेले
प्रशांत कोळसे यांचे आई-वडिल आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुर येथे वारीला जाणार आहेत. देवदर्शनासाठी जायचे असल्याने त्यांनी काही दिवसापूर्वी त्यांचे दागिने प्रशांत यांच्याकडे सांभाळण्यासाठी आणून ठेवले. चोरट्यांनी त्यांचेही सुमारे सोन्याचांदीचे दागिने चोरट्यांनी लंपास केल्याचे प्रशांत यांनी पोलिसांना सांगितले. याप्रकरणी त्यांनी सातारा ठाण्यात तक्रार नोंदविली.
वेगवेगळ्या गँगने चोºया केल्याचा संशय
पदमपु-यातील नवयुग कॉलनीत आणि रेल्वेस्टेशन परिसरातील अमृतसाई प्लाझा येथील फ्लॅट फोडून चोरट्यांनी लाखो रुपयांचे दागिने आणि रोकड पळविली. या दोन्ही चोºया करण्याची पद्धतही वेगवेगळी आहे. यामुळे या दोन्ही चोºया वेगवेगळ्या गँगने केल्या असाव्यात, असा संशय गुन्हे शाखेला आहे. असे असले तरी रेकॉर्डवरील चोरट्यांची धरपकड पोलिसांनी सुरू केली आहे.
पदमपुºयात चोरट्यांनी लुटला भरदिवसा साडेपाच लाखांचा ऐवज
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : पती-पत्नी कामानिमित्त घराबाहेर असल्याची संधी साधून चोरट्यांनी बंद घराचा कडीकोंडा तोडून सव्वाचार लाखांचे सोन्याचे दागिने आणि १ लाख २० हजार रुपये रोख असा सुमारे ५ लाख ४० हजारांचा ऐवज पळविला. ही खबळजनक घटना पदमपुरा परिसरातील नवयुग कॉलनीत शनिवारी सकाळी १० ते दुपारी पावणेदोन वाजेदरम्यान घडली. याप्रकरणी वेदांतनगर ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
शहरात चोºया, घरफोड्या आणि लुटमारीचे सत्र जोरात सुरू आहे. नवयुग कॉलनीतील वेणुगोपाल हाईटस्मध्ये राहणारे रमण रामनुज रांदड यांचे सिडको एन-३ येथे कापड दुकान आहे. त्यांची पत्नी एका बँकेत नोकरी करते. हे दाम्पत्य शनिवारी सकाळी १० वाजता घराला कुलूप लावून आपापल्या कामाला गेले. ही संधी साधून चोरटे फ्लॅटचा कडीकोंडा तोडून आत घुसले. लोखंडी कपाटात ठेवलेले सुमारे १ लाख २० हजार रुपये, ६ तोळ्याचे सोन्याचे तीन मणी मंगळसूत्र, तीन तोळ्याच्या पाटल्या, एक तोळ्याचे ब्रासलेट, चार तोळ्याचे कानातील ८ जोड आणि एक ग्रॅमची नथ असे सुमारे १४ तोळे दागिने चोरले. दुपारी पावणेदोन वाजेच्या सुमारास रमण यांची पत्नी घरी गेल्या. त्यांना घराचे दार उघडे दिसले. पती घरी आले असतील असे समजून त्या घरात गेल्या तेव्हा त्यांना सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. दाराचा कोंडा तुटलेला आणि कुलूप दुसºयाच ठिकाणी पडलेले होते. चोरट्यांनी घर फोडल्याचे निदर्शनास येताच त्यांनी पतीला कळविले. त्यांचे शेजारी अ‍ॅड. खंडागळे यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून माहिती दिली.
पोलिसांची घटनास्थळाची पाहणी
गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त रामेश्वर थोरात, पोलीस निरीक्षक मधुकर सावंत, सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे आणि अन्य अधिकारी, कर्मचाºयांनी घटनास्थळाची पाहणी केली. श्वान पथक, ठस्से तज्ज्ञांनाही पाचारण करून चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला.

Web Title: In Aurangabad, two houses have been destroyed by 36 tola gold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.