लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 09:51 PM2019-05-26T21:51:21+5:302019-05-26T21:51:32+5:30

ओळखीच्या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तसेच तिच्या नातेवाईकांना जिवे मारण्याची धमकी देत तीन वर्षे अत्याचार करणाऱ्या नराधमाविरोधात सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

Atrocity against the woman by showing lover of marriage | लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार

googlenewsNext

औरंगाबाद : ओळखीच्या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तसेच तिच्या नातेवाईकांना जिवे मारण्याची धमकी देत तीन वर्षे अत्याचार करणाऱ्या नराधमाविरोधात सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

आशिष गजेंद्र ब्रह्मे (३३,रा.बीड बायपास परिसर)असे गुन्हा नोंद झालेल्याचे नाव आहे. याविषयी अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, आरोपी आणि पीडिता हे परस्परांच्या ओळखीचे आहेत. आरोपीचा २०१४ मध्ये विवाह झालेला असून त्याला एक चार वर्षांचा मुलगा आहे.

आरोपीने पीडितेसोबत ओळख वाढवून तिच्यासोबत जवळीक निर्माण केली. पीडिता ही खाजगी नोकरी करते. ६ एप्रिल २०१६ रोजी रात्री पीडिता घरी असताना त्याने तिला ज्युबिली पार्क येथील महावितरण कंपनीच्या कार्यालय परिसरात बोलावून घेतले. पीडिता तेथे गेल्यानंतर त्याने तिच्याकडे पैशांची मागणी केली. पीडितेने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर आरोपीने तिला मारहाण क रीत तिच्यावर दोन वेळा अत्याचार केला. हा प्रकार कोणाला सांगितला तर तुझ्या आई-वडिलांना आणि बहिणीला जिवे मारून टाकीन, अशी धमकी त्याने दिली.

यानंतर काही दिवसांनी त्याने तिला आई-वडिलांपासून स्वतंत्र राहण्यास भाग पाडले. पीडिता नारळीबाग येथील महिला वसतिगृहात राहण्यास गेली, तेथे येऊन तो तिला लग्नाचे आमिष दाखवून घेऊन जात आणि तिच्यावर अत्याचार करीत. एवढेच नव्हे तर त्याने तिला मिलकॉर्नर परिसरात खोली भाड्याने घेऊन तेथे राहण्यास सांगितले. लग्नाचे आमिष दाखवून तो तिच्या खोलीमध्ये जाऊन पती-पत्नीसारखे संबंध ठेवत.

२०१६ पासून सुरू असलेल्या या अत्याचाराबाबत पीडितेने नातेवाईकांना सांगितले. त्यांनी तिला धीर दिल्यानंतर पीडितेने आरोपी आशिष ब्रह्मेविरोधात सिटीचौक पोलीस ठाण्यात बलात्काराची तक्रार नोंदविली. पोलीस उपनिरीक्षक नागरे या गुन्ह्याचा तपास करीत आहे.

Web Title: Atrocity against the woman by showing lover of marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.