औरंगाबादच्या १00 जणांनी लुटला भांगशीमाता गड येथे रॅपलिंगचा आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 12:29 AM2018-05-25T00:29:32+5:302018-05-25T00:30:39+5:30

इंडियन कॅडेट फोर्सतर्फे भांगशी मातागड येथे नुकत्याच झालेल्या कॅम्पिंग आणि रॅपलिंगमध्ये १00 जणांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. या रॅपलिंगमध्ये साहसी खेळातील खेळाडू, युवक, युवती, डॉक्टर, उद्योजकांनी सहभाग नोंदवला.

100 people of Aurangabad robbed of rapping in Bhangshmata fort | औरंगाबादच्या १00 जणांनी लुटला भांगशीमाता गड येथे रॅपलिंगचा आनंद

औरंगाबादच्या १00 जणांनी लुटला भांगशीमाता गड येथे रॅपलिंगचा आनंद

googlenewsNext

औरंगाबाद : इंडियन कॅडेट फोर्सतर्फे भांगशी मातागड येथे नुकत्याच झालेल्या कॅम्पिंग आणि रॅपलिंगमध्ये १00 जणांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. या रॅपलिंगमध्ये साहसी खेळातील खेळाडू, युवक, युवती, डॉक्टर, उद्योजकांनी सहभाग नोंदवला.
रॅपलिंगमध्ये सहभागी झालेल्यांना इंडियन कॅडेट फोर्सचे कमांडर विनोद नरवडे यांनी मार्गदर्शन केले. तसेच आयसीएफचे मोहंमद असलम आणि राहुल अहिरे यांनी प्रात्यक्षिक दाखवून रॅपलिंग करण्याची योग्य पद्धत दाखवताना सहभागी झालेल्यांना सूचना केल्या. रॅपलिंग यशस्वी करण्यासाठी किशोर नावकर, राहुल अहिरे, मोहंमद असलम, रत्नदीप देशपांडे, राज घोगरे, संदेश कदम, अमित ससाने, कल्पेश शिंदे, दीपक कोलते, मनीष पहाडिया, सूरज सुलाने, चेतन सरोदे, शोएब पठाण, योगेश मुंगीकर, राहुल नवले यांनी परिश्रम घेतले. आता आयसीएफतर्फे २ व ३ जून रोजी प्रबळमाची व कलावंतीदुर्ग, ९ व १0 जून रोजी सांधनदरी व १६ व १७ जूनदरम्यान महाराष्ट्रातील सर्वोच्च उंचीवर असणाऱ्या कळसूबाई शिखर गिरीभ्रमण मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेत सहभागी होऊ इच्छिणाºयांनी आयसीएफचे पैठणगेट येथील कार्यालय, किशोर नावकर, राहुल अहिरे, राज घोगरे यांच्याशी संपर्क साधावा.

Web Title: 100 people of Aurangabad robbed of rapping in Bhangshmata fort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :