धामणगावात अरुण अडसड यांचे जल्लोषात स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 01:31 AM2018-10-01T01:31:28+5:302018-10-01T01:32:26+5:30

विदर्भाचा बुलंद आवाज विधानपरिषदेचे आमदार अरुणभाऊ अडसड यांचे शनिवारी धामणगाव मतदारसंघातील प्रत्येक गावात जंगी स्वागत करण्यात आले. मुंबई - हावडा मेलने ते शनिवारी ८ वाजता बडनेरा रेल्वे स्थानकावर आले.

Welcome to Arun Adad's Festival of Wreath | धामणगावात अरुण अडसड यांचे जल्लोषात स्वागत

धामणगावात अरुण अडसड यांचे जल्लोषात स्वागत

Next
ठळक मुद्देजंगी मिरवणूक : भाजपजणांनी साजरा केला आनंदोत्सव

लोकमत न्यूज नेटवर्क
धामणगाव रेल्वे/चांदूर रेल्वे : विदर्भाचा बुलंद आवाज विधानपरिषदेचे आमदार अरुणभाऊ अडसड यांचे शनिवारी धामणगाव मतदारसंघातील प्रत्येक गावात जंगी स्वागत करण्यात आले.
मुंबई - हावडा मेलने ते शनिवारी ८ वाजता बडनेरा रेल्वे स्थानकावर आले. तद्नंतर भाजपा जिल्हा कार्यालयात त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी जयंत डेहनकर, तुषार भारतीय, शिवराय कुळकर्णी, लता देशमुख, निवेदिता दिघडे, चांदूर रेल्वेचे नगराध्यक्ष प्रताप अडसड, जिल्हा परिषद सदस्य रवींद्र मुंदे, रविकांत देशमुख, प्रशांत बदनोरे, किशोर जाधव, हरिचंद्र खंडारकर, कविता अग्रवाल आदी भाजपक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील बेलोरा येथून सुरू झालेल्या धामणगाव मतदारसंघातील लोणी टाकळी, वाटपूर, शेलुगुंड, पिंपळगाव निपाणी, धानोरा गुरव, शिरपूर, नांदगाव खंडेश्वर, सावंगी संगम, राजुरा एकपाळा, पळसखेड येथील शेतकरी, ग्रामस्थांसह शेतमजूर, ग्रामस्थांनी अरुण अडसड यांचे पुष्पहाराने सत्कार केला. अडसड यांनी हात जोडून सर्वांचे आभार मानले.

धामणगावात गुलालाची उधळण
विधान परिषदचे आमदार म्हणून अविरोध निवड झाल्यानंतर पहिल्यांदा धामणगावात आ. अरुण अडसड यांचे आगमन होताच कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला. स्वागताची जय्यत तयारी करून मारोती मंदिर सर्वोदय कॉलनी येथून त्यांचे स्वागत रॅली काढली गेली. शात्री चौक, नगर परिषद, टिळक चौक, सिनेमा चौक, मेन रोड,गांधी चौक, रेल्वे गेट, मार्गे कॉटन मार्केट चौक, अमर शहीद भगतसिंग चोकात पोहचल्यावर जाहीर सभेद्वारे रॅलीचा समारोप करण्यात आला.

चांदूर रेल्वेत मिरवणूक
शहरात आगमन होताच खुल्या जीपवरून मिरवणूक काढण्यात आली. ढोलताषांचा गजर व फटाक्यांच्या आतषबाजीत 'अरुण भाऊ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हैं' आशा गगनभेदी घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्यात. या मिरवणुकीत प्रत्येक शहरवासीयांना अडसड यांचे औक्षवण करीत पुष्पगुच्छाने स्वागत केले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्य शिक्षकांना संघस्थानावर येणारा प्रत्येक स्वयंसेवक प्रणाम करतो. त्यावेळी मुख्य शिक्षकांचे वय पाहले जात नाही. हेच संस्कार भाजपमध्ये कायम आहे. माझ्यापेक्षा वयाने लहान मोठे असलेले परंतु पक्षश्रेष्ठींचे आभार मानतो.
- अरुण अडसड,
आमदार, विधानपरिषद

Web Title: Welcome to Arun Adad's Festival of Wreath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.